Satyaprem Ki Katha 1st Day Box Office Collection : कार्तिक-कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट २९ जूनला प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. कियारा-कार्तिकची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपटातून कार्तिक-कियाराची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा पाहायला प्रेक्षक सज्ज होते. (Latest Entertainment News)
काल म्हणजेच २९ जूनला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बकरी ईद म्हणजेच सुट्टीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाल्याने चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण वीकेंडला प्रेक्षकांची आणखी गर्दी होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
समीर विध्वंस दिग्दर्शित 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कमी केली आहे. चित्रपट समीक्षण तरण आदर्श यांनी ट्विट करत 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनविषयी अपडेट शेअर केली आहे.
भारतात गुरुवारी २९ जुलैला ९.२५ कोटींची कमाई केली आहे. 'भूलभूलैय्या २', 'लव आज कल' नंतर कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' तिसरा सर्वोत्तम ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
कदाचित दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० जूनला चित्रपटाची कमाई कमी होईल कारण हा वर्किंग डे आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वीकेंडमुळे चित्रपटाला अजून गर्दी होण्याची शक्यता तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. हा चित्रपट कुंटुबावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल.असं तरुण आदर्श यांनी म्हटलं आहे.
'सत्यप्रेम की कथा' चित्रपटात कार्तिक-कियारा प्रमुख भूमिकेत आहे. कार्तिक हा सत्यप्रेम तर कियारा कथा हे पात्र साकारत आहे. याआधी हे दोघेही 'भूलभूल्लैया २'मधून एकत्र झळकले होते.
कियारा कार्तिकच्या या लव्हस्टोरीला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहे. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाल यांनी केली आहे. तर चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.