Akshay Kumar Announces Housefull 5 : 'हाऊसफुल 5'ची घोषणा ; दिवाळीत होणार प्रदर्शित

Housefull 5 Released Date Out : अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे.
Housefull 5 Announces
Housefull 5 AnnouncesSaam TV
Published On

Riteish Deshmukh Share Housefull 5 Post : पॉवरहाऊस या निर्माती संस्थेने आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. साजिद नाडियादवाला यांच्याकडे हाऊसफुल फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. हाऊसफुल त्याच्या गगनी भागासाठी सज्ज आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील 5 भाग असलेला हा पहिलाच फ्रँचायझी चित्रपट आहे.

अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. या पोस्टरमुळे हाऊसफुलचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत.

Housefull 5 Announces
Amey Khopkar Tweet : पाकिस्तानी कलाकारांच्या तंगड्या तोडू... अमेय खोपकरांची निर्मात्यांना ताकीद

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'आम्ही परत आलो! आणि यावेळी, आम्ही तुमची दिवाळी नक्कीच अधिक प्रकाशमय करणार आहोत! फ्रँचायझीमध्‍ये आमचा पुढील चित्रपट सादर करत आहे! तरुण मनसुखानी दिग्दर्शित, 'हाऊसफुल 5' 2024 मध्ये दिवाळी प्रकाशमय करायला सज्ज आहे, मनोरंजन आणि कॉमेडी असलेला हा चित्रपट तुम्हाला एका रोलर-कोस्टर राईडची मजा देईल.

तरूण मनसुखानी दिग्दर्शित साजिद नाडियाडवालाचा 'हाऊसफुल 5' दिवाळी 2024 ला रिलीज होणार आहे. पहिला हाऊसफुल चित्रपट 2010 ला प्रदर्शित झाला आणि साजिद खानने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, लारा दत्ता, दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल, मिथुन चक्रवर्ती आणि बोमन इराणी यांचा समावेश होता.

चित्रपटाची कथा आरुष (अक्षय कुमार) भोवती फिरते, एक दुर्दैवी माणूस जो जिथे जातो तिथे आपले दुर्दैव घेऊन जातो. प्रेम शोधण्याच्या त्याच्या शोधामुळे त्याचे जीवन अधिक दयनीय होते आणि तो अडचणीत सापडतो.

या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि 2012 मध्ये त्याचा सिक्वेल रिलीज झाला. दुसऱ्या भागात जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि असीन सारखे नवीन कलाकार या चित्रपटामध्ये दिसले. दुसरा चित्रपटामध्ये चार पुरुष एकत्र येऊन त्यांची ओळख बदलून त्यांच्या भावी सासरची फसवणूक करून त्यांच्या गिर्ल्फ्रेंन्ड्सशी लग्न करतात.

फ्रँचायझीचा तिसरा भाग 2016 मध्ये रिलीज झाला. चित्रपटाचे कथानक एका श्रीमंत व्यावसायिकाभोवती केंद्रित होते. अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्या या माणसाला त्याच्या तीन मुलींचे लग्न होऊ नये असे वाटते. त्यानंतर त्या तिघींच्या बॉयफ्रेंडने सिद्ध कार्याचे होते की ते त्या मुलींसाठी योग्य आहेत. फरहाद सामजी आणि साजिद खान यांनी तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन केले आहे.

दरम्यान, चौथा भाग 2019 मध्ये रिलीज झाला. चौथ्या भागासाठी, या संकल्पनेला कॉमिक टच जोडला. तीन भावांची, तीन बहिणींशी लग्ने होणार असतात. परंतु भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यात अडकतात. (Latest Entertainments News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com