Amey Khopkar About Pakistani Actor : 72 हूरें या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून नवीन वाद सुरु झाला आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेते रशीद नाज महत्त्वाची भुमिका साकारत आहेत. पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटामध्ये दिसल्याने हा वाद उसळला आहे. यासंदर्भात आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील ट्विट केले आहे.
अमेय खोपकर आणि मनसे पूर्वीपासून भारतीय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी पुन्हा हा विरोध करत निर्मात्यांना ताकीद दिली आहे. (Latest Entertainment News)
अमेय खोपकर ट्विट
अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही.
म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.'
यापूर्वी फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्यावरून वाद झाला होता. फवाद ए-दिल है मुश्किल या चित्रपटामध्ये दिसणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. तेव्हा मनसेच्या मागणीनंतर कारण जोहरने चित्रपटामध्ये फावडचे सीन काढून टाकले होते. या चित्रपटादरम्यान पाकिस्तानच्या भारताविरोधात वाढलेल्या कारवायांमुळे फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांना विरोध सहन करावा लागला.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने 2019 मध्ये चित्रपट उद्योगात काम करणार्या पाकिस्तानी कलाकारांवर संपूर्ण बंदी जाहीर केली होती. परंतु तरीही काही निर्माते त्यांना संधी देत असल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.