priyadarshini indalkar saam tv
मनोरंजन बातम्या

रुखवतामधील बाहुल्या बोलतात? संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरच्या "रुखवत" चित्रपटाचा थरारक ट्रेलर लाँच...

Rukhavat Movie: रुखवत चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

Saam TV News

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे "रुखवत", जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाजांसोबत जोडली गेली आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट ग्रुपद्वारे प्रस्तुत आणि राबरी एन्टरटेन्मेंटने द्वारे निर्मित हा चित्रपट १३ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार असून, आज ४ डिसेंबर चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

सोबतच प्रेम, विरह, आणि ऋतूंच्या बदलत्या छटांची सुंदर अनुभूती देणारं 'ऋतु प्रेमवेडा' गाणं आणि लगीन समारंभांची पारंपारिक रोषणाई देणारं 'लगीन सराई' हे गाणं तुमच्या भेटीला आले असून ही दोनही गाणी ऐकताच प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे. ट्रेलर आणि गाणी धमाल आहे म्हटल्यावर चित्रपट सुद्धा भारी असेल यात काही शंका नाही.

या चित्रपटाची सुरुवात पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या ग्रुप ची आहे, जे शैक्षणिक सहलीसाठी एका विशाल आणि प्राचीन वाड्यात जातात. वाडा फिरत असताना संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांना त्या ठिकाणी जुने रुखवत दिसते जवळ जाऊन पाहताच त्यांना त्यातील बाहुल्यांमधून बांगड्यांचे, हसण्याचे, आणि इतर गूढ आवाज ऐकू येतात.

त्या वाड्याचा इतिहास काय आहे? त्यात मांडलेल्या रुखवतचे रहस्य काय? बाहुला बाहुलीचे आवाज ऐकू येण्यामागचे कारण नक्की काय ? वाड्यात फिरताना येणारे आवाज व होणारे भास या मागच कारण काय ? या सगळ्याचा उलगडा दोघे मिळून कसा करतात याची जुगलबंदी या चित्रपटामध्ये पहायला मिळेल.

बिंद्रा अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यांनी उद्योदक असूनही मनोरंजन आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नवकल्पकतेला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यांचा दृष्टीकोन आणि उत्पादनाची गुणवत्ता ही रुखवत मधून दिसून येणार आहे. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehndi Design : स्टायलिश अन् हटके मेहंदी डिझाइन; दिवाळीला हात दिसतील सुंदर, पाहा PHOTOS

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

SCROLL FOR NEXT