Bigg Boss 14 Fame Rubina Dilaik  Rubina Dilaik House -Instagram @rubinadilaik
मनोरंजन बातम्या

Rubina Dilaik खरंच जुळ्या मुलींची आई झाली का?, ट्रेनरने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चा

Rubina Dilaik And Abhinav Shukla Became Parents: रुबिना दिलैक जुळ्या मुलाची आई झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या जिम ट्रेनरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला.

Priya More

Rubina Dilaik Twin Babies:

‘बिग बॉस 14’ फेम आणि 'छोटी बहू' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) आणि रुबिना दिलैकने सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली होती. त्यानंतर तिने प्रग्नेंसी फोटोशूट देखील शेअर केले होते.

आता रुबिना दिलैक जुळ्या मुलाची आई झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या जिम ट्रेनरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला. पण काही वेळानंतर रुबिनाच्या ट्रेनरने ती पोस्ट डिलीट केली.

नावारूपास आलेल्या रुबिना दिलैकच्या घरात नव्या पाहुण्याचा आगमन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीव्ही स्टार रुबिना दिलाक आणि अभिनव शुक्ला जुळ्या मुलींचे आई-वडील झाल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्रीच्या जिम ट्रेनरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला खरा पण काही वेळानंतर पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यामुळे रुबिनाच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला.

रुबिना दिलैक खरंच जुळ्या मुलांची आई झाली की नाही याबाबतच्या कन्फर्म माहितीसाठी तिच्या चाहत्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेले नाही. लवकरच हे जोडपे याबाबत अधिकृत माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे.

रुबिना दिलैकच्या ट्रेनरने सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली होती. या ट्रेनरने पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'अभिनंदन'. पण नंतर अभिनेत्रीच्या ट्रेनरने ही पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकली. ट्रेनरच्या पोस्टसोबतच आणखी एक रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार रुबिना जुळ्या मुलींची आई झाली आहे अशी पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये आता किती तथ्य आहे हे आता या कपलने जाहीर केल्यानंतरच समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

SCROLL FOR NEXT