Manasvi Choudhary
अभिनेता अभिनव शुक्ला आणि अभिनेत्री रूबिना दिलैक ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे.
अभिनव शुक्ला आणि रूबिना दिलैकची पहिली भेट दोघांच्याही कॉमन फ्रेंडमुळे झाली. गणेशोत्सवादरम्यान दोघेंही एकमेकांना भेटले होते.
यावेळी दोघांची घट्ट मैत्री झाली. रूबिनाने तेव्हा साडी परिधान केली होती. ती खुपच सुंदर दिसत होती.
भेटीदरम्यान दोघांच्याही आवडी- निवडी जुळू लागल्या. दोघांनाही फिरायला आणि फोटोशूट करायला आवडते.
अभिनव आणि रूबिना यांनी अनेक टीव्ही सिरीयल आणि शोमध्ये एकत्र काम केले आहे.
एकत्र काम करता करता आधी दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
अभिनव आणि रूबिनाने ३ वर्षे एकमेकांना डेटिंग केल्यानंतर २०१८ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं.
प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' मध्ये अभिनव आणि रूबिनाने एकत्र सहभाग घेतला होता. या दरम्यानची त्याची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.