Ram Charan Films
Ram Charan Films Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Charan Hit Movies: फक्त ‘RRR’च नाही तर रामचरणचे हे हिट सिनेमे पाहिले आहेत का? जाणून घ्या

Chetan Bodke

Ram Charan Birthday: दाक्षिणात्य अभिनेता ‘रामचरण’चा आज ३८ वा वाढदिवस. रामचरण सध्या भारतातच नाही तर अवघ्या देशभरात ‘नाटू नाटू’ गाण्यामुळे बराच चर्चेत आहे. रामचरणने आपले फिल्मी करियर अनेक खडतर प्रवास करत केला आहे. आपले वडिल जरी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेते असले तरी, त्याचा फायदा न घेत आपल्या हिंमतीवर भारतीय सिनेसृष्टीत आपला वकुब निर्माण केला.

राम चरणचे पूर्ण नाव कोनिडेला रामचरण तेजा आहे. त्याचा जन्म 27 मार्च 1985 रोजी मद्रास मध्ये झाला. तो देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने 2007 मध्ये ‘चिरुथा’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘मगधीरा’, ‘येवडू’ आणि ‘RRR’ या सुपरहिट चित्रपटात रामचरणने दमदार अभिनय केला. त्यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला. राम चरण यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते आहेत ते जाणून घेऊया.

Ram Charan Film

रंगस्थलम

चित्रपटात राम चरणने चिट्टी बाबूची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटात राम चरणची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. चित्रपटाला 8.2 IMDb रेटिंग मिळाली आहे.

RRR

आरआरआर

एसएस राजामौली दिग्दर्शित, ‘RRR’चित्रपटात रामचरणने तेलगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित काल्पनिक कथा निर्माण केली आहे. चित्रपटाला 7.9 IMDb रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटात राम चरणची महत्त्वाची भूमिका होती.

Ram Charan Film

मगधीरा

मगधीरा हा तेलुगु चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन एस.एस. राजामौली यांनी केले. या चित्रपटाची कथा एका ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटात राम चरण आणि काजल अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला 7.7 IMDb रेटिंग मिळाली आहे.

Ram Charan Film

ध्रुव

चित्रपटात राम चरणसोबत रकुल प्रीत सिंग, अरविंद स्वामी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात राम चरण पोलिसाच्या भूमिकेत होता. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला 7.7 IMDb रेटिंग मिळाली आहे.

Ram Charan Film

ब्रूस ली 2 द फायटर

या चित्रपटात कार्तिकची भूमिका करणारा राम चरण आपल्या बहिणीसाठी आपल्या अभ्यासाचा त्याग करतो आणि स्टंटमॅन बनतो. राम चरणची भूमिकाही चाहत्यांना चांगलीच आवडली होती. चित्रपटाला 5.5 IMDb रेटिंग मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

SCROLL FOR NEXT