RRR Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

RRR Movie: ज्युनियर एनटीआरचे चित्रपटाबद्दल मोठे वक्तव्य, 'चित्रपटाला भारतापेक्षा जपानने दिले सर्वाधिक प्रेम'

ज्युनियर एनटीआरने 'आरआरआर'विषयी जगभरातील प्रतिक्रियांबद्दल मत व्यक्त केले आहे.

Pooja Dange

Jr NTR Spoke About RRR Movie: एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये 'नाटू-नाटू'ने सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याच्या कॅटेगरीत पुरस्कार पटकावला आहे. तेव्हापासून सगळीकडे 'आरआरआर' आणि 'नाटु-नाटु'ची चर्चा होत आहे.

'आरआरआर' संपूर्ण टीम आणि चित्रपटातील मुख्य कलाकार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण खूपच आनंदी आहेत. पुरस्कार जिंकल्यानंतर एका मुलाखतीत ज्युनियर एनटीआरने सांगितले की, 'आरआरआर'ला पाश्चात्य देशांमध्ये खूप पाठिंबा मिळत आहे. या चित्रपटाला भारतापेक्षा जपानमध्ये जास्त प्रेम मिळाल्याचेही त्याने म्हटले आहे.

ज्युनियर एनटीआरने 'नाटू-नाटू'साठी पुरस्कार जिंकल्यानंतर मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान ज्युनियर एनटीआरने जगभरातील प्रतिक्रियांबद्दल मत व्यक्त केले आहे. 'आरआरआर' चित्रपटाला भारतापेक्षा जपानमध्ये जास्त प्रेम मिळाल्याचे त्याने येथे सांगितले. ज्युनियर एनटीआर म्हणाला, 'मी जपानमध्ये होतो आणि तिथे मी लोकांना रडताना पाहिले. प्रेक्षक म्हणून त्यांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिले आहे, असे मला वाटते. हे भारतात मिळालेल्या प्रेमापेक्षा खूप जास्त होते.'

ज्युनियर एनटीआरने मुलाखतीत सांगितले की, 'आधी आम्हाला वाटले की प्रमोशन फक्त सोशल मीडियावर होत आहे आणि फक्त भारतीय किंवा आमचे मित्रच चित्रपट पाहणार आहेत. पण तसे नव्हते. लोकांचं चित्रपटाबद्दलचं प्रेम वाढतच गेलं, जे पाहून आम्हाला वाटलं की या चित्रपटाची क्रेझ खूप आहे.

'आरआरआर'ने जपानमध्ये उत्तम कामगिरी केले आहे. एसएस राजामौली यांचा चित्रपट जपानमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. पहिल्या वीकेंडमध्येच चित्रपटाने 35 मिलियन येन कमावले. चित्रपटाचे एकूण कॅलेक्शन 403 दशलक्ष येन आहे. यावरून जपानमधील 'आरआरआर'ची क्रेझ दिसून देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT