Rohit Shetty House Firing Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार कुणी केला? संशयितांची नावं आली समोर; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा CCTV व्हिडिओ आणि संशयितांची नावं समोर आला आहे. चौकातून तरुणाने गोळीबार करून दुचाकीवरून फरार झाल्याचे फुटेजमध्ये दिसते.

Shruti Vilas Kadam

Rohit Shetty House Firing Case: बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेतल्या नंतर आता पोलिसांना या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला आहे.

संशयितांची नावे

पुण्यातील वारजे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आता समोर आली आहेत. अमान मोरोटे (२७), आदित्य गायकी (१९), सिद्धार्थ येनपुरे (२०), समर्थ पोमाजी (१८) आणि स्वप्नील सकट (२३) अशी ताब्यात घेतलेल्या पाचही संशयितांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच जणांपैकी चार संशयितांना घेऊन मुंबई पोलिसांचे पथक पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. उर्वरित पाचव्या आरोपीलाही थोड्याच वेळात मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

'सुपारी' दिली होती का?

पोलिस तपासात ताब्यात घेतलेले पाचही संशयित देशातील कुख्यात गँगशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गँगचे नेटवर्क पुणे, मुंबईसह इतर राज्यांमध्ये पसरले असल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. या प्रकरणात गोळीबार करण्यासाठी कोणीतरी 'सुपारी' दिली होती का, तसेच हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर

रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या घटनेबाबत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एक तरुण रोहित शेट्टी यांच्या घरासमोर असलेल्या चौकातून इमारतीच्या दिशेने गोळीबार करताना स्पष्टपणे दिसून येतो.

आणखी खुलासे होण्याची शक्यता

फुटेजमध्ये तरुण काही वेळ थांबून नंतर गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. गोळीबारानंतर हा तरुण बाईकवर बसून घटनास्थळावरून फरार झाल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग आला असून हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. या फुटेजमुळे गोळीबार कसा आणि कोणत्या दिशेने झाला, याचा अंदाज पोलिसांना मिळत आहे. लवकरच या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT