Ruchira Jadhav And Rohit Shinde  Instagram/ @ruchira_rj
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: अपूर्वा स्पर्धकांची खिल्ली घेण्यातही तरबेज; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नक्की काय चाललंय बिग बॉसच्या घरात?

शेअर केलेल्या एका व्हिडिओत अपूर्वा, रोहित मिळून रुचिरा कशी बोलते यावर खिल्ली उडवताना दिसत आहे. अपूर्वा रॅपरसारखी अॅक्शन करत रुचिराची अॅक्टिंग करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नुकताच बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील दुसरा कॅप्टन मिळाला आहे. त्यासाठी रोहित शिंदे आणि अक्षय केळकर स्पर्धेत होते. बिग बॉसच्या घरात काल दुसरा कॅप्टन कोण बनणार याची चढाओढ पहायला मिळाली. दुसऱ्या आठवड्यासाठी कॅप्टन्सी कार्य पार पडत बिग बॉसच्या घरात पार्किंगचा टास्क रोहित शिंदे जिंकल्याने तो दुसऱ्या आठवड्यातील कॅप्टन बनला आहे. (Bigg Boss) (Marathi Entertainment News)

पहिल्या दिवसापासून घरात तंटे होताना दिसत आहेत. स्पर्धकांमध्ये आपापसात वाद- विवाद, राडा, मस्ती, चेष्टा- मस्करी पहायला मिळत आहे. दररोज बिग बॉसच्या घरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये अपूर्वा, रोहित दोघेही मिळून रुचिराची खिल्ली उडवत आहे.

कलर्स मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अपूर्वा, रोहित मिळून रुचिरा कशी बोलते यावर खिल्ली उडवताना दिसत आहे. अपूर्वा रॅपरसारखी अॅक्शन करत रुचिराची अॅक्टिंग करत आहे. रुचिराही याचा आनंद घेताना दिसत आहे. त्यामुळे तिघांचाही धम्माल करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगालाच व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान आगामी दिवसात अजून किती राडे पाहायला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सोबतच यंदाच्या आठवड्यातील चावडीमध्ये महेश सर कोणावर टिकेचे बाण सोडणार हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर! रेल्वेची स्कूल बसला जबर धडक, ३ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Sonalee Kulkarni : कुण्या गावाचं आलं पाखरू; सोनालीच्या सौंदर्याने केलाय कहर, पाहा PHOTOS

Parbhani: ३ भावांची आदर्श वाटणी! २ शिक्षक भावांनी तिसर्‍याला सर्वकाही दिले, वडिलांच्याही डोळ्यात पाणी

Mira Bhayandar: महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिका, मुस्लिम बांधवाचा सल्ला|VIDEO

Nagpur: कुत्र्याला पाहून घाबरला, पळताना ५ व्या मजल्यावरून पडला; १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT