Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 2nd Day Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 2nd Day Collection: रणवीर- आलियाचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ बॉक्स ऑफिसवर सुसाट, विकेंडला केली इतक्या कोटींची कमाई

Chetan Bodke

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 2nd Day Box Office Collection: गेल्या २८ जुलैला प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ची सध्या बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई सुरू आहे. घोषणा झाल्यापासून चर्चेत राहिलेल्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने कशी कमाई केली, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपट समीक्षकांसह, प्रेक्षकांकडून आणि सेलिब्रिटींकडूनही चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ७ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर निर्माता करण जोहर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून या चित्रपटाची प्रेक्षकांना फारच उत्सुकता होती. ‘ऐ दिल है मुश्किल’नंतर करणने कोणत्याही चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नाही. चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोगसह अनेक कलाकार आहेत. (Bollywood Actor)

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने ११.१० कोटीचा आकडा गाठला असून सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे हा आकडा फारच कमी असून निर्माते काही प्रमाणात चिंतेत आहेत. नुकतंच दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत जे फारच समाधानकारक आहेत. ‘सॅकनिल्क’ या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास १६ कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाने अवघ्या दोन दिवसातच आणि पहिल्या विकेंडचा फायदा घेत चित्रपटाने २५ कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचं एकूण बजेट १६० कोटी असून आत्तापर्यंत चित्रपटाने २७.१० कोटींची कमाई केली आहे. येत्या विकेंडला हा चित्रपट किती कमाई करणार याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे.

चित्रपटात आलियाने एका बंगाली मुलीचे पात्र साकारले असून आणि रणवीरने पंजाबच्या मुलाचे पात्र साकारले. चित्रपटात रणवीरच्या पात्राचे नाव रॉकी रंधावा आहे तर, आलियाने रानीचे पात्र साकारलेय. ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’चं कथानक इथिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलं असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरो जोहर आणि अपूर्व मेहताने केले आहे. चित्रपट देशभरातील ३२०० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

SCROLL FOR NEXT