Riteish Deshmukh - Raja Shivaji Trailer  saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh - Raja Shivaji Trailer : आई भवानीच्या नावानं चांगभलं! डोळ्यात पाणी अन् छातीत अभिमान, रितेशच्या ‘राजा शिवाजी’चा जबरदस्त ट्रेलर| VIDEO

Raja Shivaji Trailer Video : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज होणार आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आलाय.

रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh ) बहुप्रतीक्षित चित्रपट 'राजा शिवाजी' चा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखने केले आहे. तसेच तो सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील गाणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली आहेत. तर नृत्य दिग्दर्शन रेमो डिसूजा यांचे आहे. ट्रेलर ३ मिनिटांचा आहे. ट्रेलरमध्ये रितेश देशमुख शिवरायांच्या भूमिकेत स्वराज्यासाठी लढताना दिसत आहे. ट्रेलर (Raja Shivaji Trailer) पाहून अंगावर काटा येईल.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील झळकणार आहे. 'राजा शिवाजी'चा ट्रेलर आज (२० एप्रिल) ला रिलीज झाला. रितेश देशमुख एका योद्धा सारखा लढताना दिसत आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटातून शिवाजी महाराजांचा स्वराज्यासाठीचा लढा जवळून पाहता येईल. चित्रपटातील प्रत्येक कलाकार दमदार भूमिक साकारताना दिसत आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यासोबत कसं स्वराज्य उभे केले, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट भव्य इतिहासाची उजळणी होय.

'राजा शिवाजी' स्टार कास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.

'राजा शिवाजी' चित्रपट रिलीज डेट

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगाव महापालिकेत पत्रकारांचा छळ? निषेधार्थ ठिय्या आंदोलन

Riteish Deshmukh-Raja Shivaji : अमोल कोल्हे ते रितेश देशमुख, आतापर्यंत कोणत्या अभिनेत्यांनी साकारली शिवरायांची भूमिका?

Chanakya Niti: ४ चुका तुमचं आयुष्य बरबाद करु शकतात, संकटातून वाचण्यासाठी चाणक्य सांगितली गुपितं

रिफायनरीला प्रकल्पात भीषण आग, PM मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन, आज घडली दुर्घटना

Maharashtra Politics: शिवसेनेच्या आमदाराने शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT