Riteish - Raja Shivaji Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

Raja Shivaji Box Office Collection Day 29 : 'राजा शिवाजी' चित्रपट १ महिन्यापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या चित्रपटाने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांनाही मागे टाकले आहे. चित्रपटाचे एकूण कमाई जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

'राजा शिवाजी' चित्रपटाला सलमान खानच्या एन्ट्रीने चारचाँद लागले.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट रिलीज होऊन आता एक महिना झाला आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला (महाराष्ट्र दिन) ला रिलीज झाला. या चित्रपटाने हिंदीसोबत मराठीतही बाजी मारली आहे. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत झळकला आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे २९ दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २९

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने २९ व्या दिवशी भारतात ३५ लाख रुपयांची कमाई केली. तर २८ व्या दिवशी ४५ लाख रुपयांचा व्यवसाय केला. २९ दिवसांत चित्रपटाची एकूण भारतातील नेट कमाई १०३.१५ कोटी रुपयांच्यावर पोहचलेली आहे. आता महिन्याच्या अखेरला (वीकेंड- शनिवार, रविवार) ला रितेश भाऊंचा 'राजा शिवाजी' किती कोटींचा गल्ला जमावतो, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटाने आपले बजेट कधीच वसूल केले असून बंपर नफा मिळवला आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन , सलमान खान असे अनेक कलाकार झळकले आहेत. चित्रपटाच्या गाण्यांना अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. 'राजा शिवाजी' ची अलिकडेच धमाकेदार success पार्टी पार पडली.

मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळू शकतो असे बोले जात आहे. मात्र अद्याप ओटीटी प्लेटफॉर्म आणि ओटीटी रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

Crime News : पोलिस अन् गुन्हेगारांमध्ये चकमक, ४ आरोपींचा एन्काऊंटर; ३ पोलिस गंभीर जखमी

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

SCROLL FOR NEXT