Riteish - Raja Shivaji Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : "शिवाजी राजे म्हणायचं!"; 'राजा शिवाजी'नं दुसऱ्या मंगळवारी केली बक्कळ कमाई, रितेश देशमुखच्या चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

Raja Shivaji Box Office Collection Day 12 : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने दोन आठवड्यात बक्कळ कमाई केली. दुसऱ्या मंगळवारी चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

१ मे ला 'राजा शिवाजी' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला.

'राजा शिवाजी' मध्ये सलमान खान देखील पाहायला मिळाला.

अजय-अतुलने आपल्या संगीताने चित्रपटाला चारचाँद लावले.

१ मे म्हणजेच महाराष्ट्रा दिनाला रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने दोन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटातील डायलॉग खूपच भारी आहे. तसेच अजय-अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटाते दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले असून चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाने जगभरात ₹८१–८६ कोटींहून अधिक कमाई केली असून, तो आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक बनला आहे.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १२

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातील सोमवार २.४० कोटी रुपये आणि मंगळवारी २.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळे रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची एकूण कमाई ७३.१५ कोटींवर पोहोचली आहे. येणाऱ्या वीकेंडला चित्रपट किती कोटी कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'राजा शिवाजी' बजेट

मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' हा चित्रपट ७५-१०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपट आपले बजेट वसूल करण्यापासून काही पावले दूर आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हिंदीपेक्षा मराठी आवृत्तीत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.

'राजा शिवाजी' स्टारकास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात हिंदीसोबतच मराठी कलाकार देखील झळकले आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानचा cameo सुद्धा पाहायला मिळत आहे. चित्रपटात सलमान खानने जीवा महाला यांची भूमिका साकारली आहे. तसेच जिनिलियाने सईबाईंची भूमिका, स्टार संजय दत्त अफजल खानची भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले (संभाजी राजे) यांची प्रमुख भूमिका अभिषेक बच्चनने साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'एका व्यक्तीमुळं झालं सगळं! शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर संजय पाटलांनी सांगितलं ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण

Maharashtra News Live Update: मोहरम सणानिमित्त मंगळवारी होणारा 48 तासांचा शटडाऊन रद्द

Chanakya Niti: प्रत्येक महिलेमध्ये असायला हवेत हे 5 गुण; चाणक्यांचे विचार बदलू शकतात आयुष्य

Operation Tiger: मातोश्रीबाहेर शिंदेसेनेची बॅनरबाजी, ६ खासदारांच्या प्रवेशानंतर ठाकरेंना डिवचलं; पाहा VIDEO

ज्यांचं नाव लागेल तेच खरे नशीबवान! घराचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार? 13 फ्लॅट्ससाठी 17,755 अर्जदारांचे नशीब पणाला

SCROLL FOR NEXT