Riteish - Raja Shivaji Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Raja Shivaji Box Office Collection Day 10 : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. दुसऱ्या रविवारी किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाने मराठी आवृत्तीत बक्कळ कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत असलेला 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच तो या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील आहे. या चित्रपटाचे दमदार प्रमोशन करण्यात आले. या चित्रपटात बॉलिवूडसोबतच मराठी कलाकार देखील झळकले आहेत. या चित्रपटातील गाणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली आहे. चित्रपटातील गाणी आणि डायलॉग ऐकून अंगावर नक्कीच काटा येतो.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १०

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने १० व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ६.८० कोटी रुपयांची नेट कमाई केली. ही कमाई ४,०६३ शोजमधून झाली असून शनिवारी झालेल्या ५.६० कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईच्या तुलनेत यात २१.४ टक्क्यांची वाढ दिसून येते. यामुळे 'राजा शिवाजी'ची भारतातील आतापर्यंतची नेट कमाई ६८.२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ८१.०० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित 'राजा शिवाजी' चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. मराठी आवृत्तीत चित्रपटाने बक्कळ कमाई केली.

  • दिवस १ (हिंदी): ३.३५ कोटी रुपये; (मराठी): ८ कोटी रुपये

  • दिवस २ (हिंदी): ३.४० कोटी रुपये; (मराठी): ७.१५ कोटी रुपये

  • दिवस ३ (हिंदी): ४.२५ कोटी रुपये; (मराठी): ७.७५ कोटी रुपये

  • दिवस ४ (हिंदी): १.३५ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • दिवस ५ (हिंदी): १.५५ कोटी रुपये; (मराठी): ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ६ (हिंदी): १.२५ कोटी रुपये; (मराठी): ३ कोटी रुपये

  • दिवस ७ (हिंदी): १.२५ कोटी रुपये; (मराठी): २.७५ कोटी रुपये

  • दिवस ८ (हिंदी): ०.७० कोटी रुपये; (मराठी): २.५० कोटी रुपये

  • दिवस ९ (हिंदी): १.३२ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • दिवस १० (हिंदी): १.८० कोटी रुपये; (मराठी): ५ कोटी रुपये

  • एकूण: ६८.२५ कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

६८.२५ कोटींच्या कमाईसह 'राजा शिवाजी' सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. आता 'राजा शिवाजी'च्या निशाण्यावर 'बाईपण भारी देवा' आणि 'सैराट' हे दोन चित्रपट आहेत.

भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 मराठी चित्रपटांची ( नेट कमाई) यादी

  • सैराट – ₹९० कोटी

  • बाईपण भारी देवा – ₹७६.२८ कोटी

  • राजा शिवाजी – ₹६८.२५ कोटी (१० दिवस)

  • वेड – ₹६१.२ कोटी

  • नटसम्राट – ₹४२ कोटी

'राजा शिवाजी' स्टार कास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. महेश मांजरेकरांनी लखुजी जाधव, राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री , अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले आणि संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत झळकला आहे. तसेच यांच्यासोबत चित्रपटात सचिन खेडेकर, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे कलाकारही दिसले. चाहते आता चित्रपटाच्या ओटीटी अपडेटची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT