Manasvi Choudhary
'क्रांतिज्योती विद्यालय' नंतर 'राजा शिवाजी' या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे.
पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस 'राजा शिवाजी' चित्रपटाने 57.70 कोटीचा टप्पा पार केला आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा मान 'राजा शिवाजी'ने मिळवला आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटात रितेश देशमुखने महत्वाची भूमिका साकारली आहे.
हिंदी आणि मराठीत एकाचवेळी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या मराठी आवृत्तीने पहिल्याच दिवशी 12.40 कोटींची कमाई केली.
मराठीतील सर्वांधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये चौथ्या क्रमाकांचे स्थान राजा शिवाजीने मिळवले आहे.