Riteish - Raja Shivaji Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' मराठीनंतर हिंदीतही १ नंबरवर! रितेश भाऊंनी रचला इतिहास, कमावले तब्बल 'इतके' कोटी

Raja Shivaji Box Office Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असून हिंदी आवृत्तीत मोठा इतिहास रचला आहे. चित्रपटाची एकूण कमाई, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला

'राजा शिवाजी' हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.

'राजा शिवाजी' चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा गेले १ महिना बोलबाला पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे ला रिलीज झाला. मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपट जवळपास ७५-१०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाने मोठा इतिहास रचला आहे. मराठीसोबतच हिंदी भाषेतही 'राजा शिवाजी' ने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' चित्रपटाची कमाई

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' मराठी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'राजा शिवाजी' ने मराठी भाषेत ग्रॉस कमाई ८२.६६ कोटी रुपये आणि नेट कमाई ७०.०२ कोटी रुपये झाली आहे. चित्रपटाने हिंदीत २९.७१ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई आणि २५.१५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. राजा शिवाजी हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला आहे. रितेश देशमुखने मोठा इतिहास रचला. 'राजा शिवाजी' चित्रपटाची मराठी आणि हिंदी मिळून भारतातील एकूण नेट कलेक्शन ९५.१७ कोटी रुपये आणि ग्रॉस कलेक्शन ११२.३८ कोटी रुपये झाले आहे. परदेशातही 'राजा शिवाजी' चा डंका पाहायला मिळत आहे. परदेशातून चित्रपटाने ४.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर जगभरातील एकूण कलेक्शन ११६.६५ कोटी पार आहे.

'राजा शिवाजी' स्टार कास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील मोठे कलाकार पाहायला मिळत आहेत. चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जिनिलीया सईबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. तसेच चित्रपटात सलमान खान, अभिषेक बच्चन , संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव असे असंख्य कलाकार झळकले आहेत.

'राजा शिवाजी' ओटीटी

अपडेट मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळू शकतो असे बोले जात आहे. मात्र अद्याप ओटीटी प्लेटफॉर्म आणि ओटीटी रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: 'माझं नाव खराब होतंय...'; 'काला हिरण' चित्रपटावरून सलमान खान भडकला, थेट कोर्टात ठोकली धाव!

Veen Doghantali Hi Tutena Video : स्वानंदीचा रुद्रावतार! शेवटची संधी दिली अन् दिराला कानाखाली लगावली; समरनेही घेतला 'हा' मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी 16 उमेदवारांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra News : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक! पुणे नाशिक महामार्ग रोखला, तरुणाचा विषारी औषध पिण्याचा प्रयत्न

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत कोण आणि महिला किती अपात्र? वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT