Riteish Deshmukh: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाच्या साताराच्या माहुली येथील कृष्णा नदीच्या सेटवर शूटिंगदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी कोरिओग्राफी टीमचा एक सदस्य कृष्णा नदीत बुडून मृत्यूमुखी पडला असून, दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे.
ही घटना चित्रपटाच्या शूटिंगसाठी निवडलेल्या लोकेशनवर घडली. शूटिंगदरम्यान कोरिओग्राफी टीमचा सदस्य नदीत पडला आणि प्रवाहात वाहून गेला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली होती. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर, स्थानिक प्रशासनाने मृतदेह शोधून काढला.
या घटनेमुळे चित्रपटाच्या टीममध्ये शोककळा पसरली आहे. रितेश देशमुख आणि संपूर्ण टीमने या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चित्रपटाच्या शूटिंगला काही काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. टीमने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहानुभूती व्यक्त केली असून, त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
'राजा शिवाजी' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, रितेश देशमुखचा हा दुसरा दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात स्वतः रितेश शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.