Rishab Shetty Actor and Director Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rishab Shetty: कांतारा चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने दिला यशाचा मंत्र, म्हणाला....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rishab Shetty on Bollywood: कांतारा चित्रपटाला मिळालेले यश हे एखाद्या स्वप्नासारखे आहे. लोककथा आणि धार्मिक विधींवर आधारित हा कन्नड चित्रपट 16 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. आता हा चित्रपट दुसरा-सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला आहे. तसेच हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे.

कांतारा चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने या यशाचे श्रेय चित्रपटाच्या पॅकेजिंगला दिले आहे. या चित्रपटाच्या कथेची मुळे कर्नाटकच्या किनारी भागातील संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीला दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे यश का मिळत नाही? असा सवालही त्याने उपस्थित केला.

कांताराला संपूर्ण भारतात मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाचे इतर भाषांमध्ये रिमेक किंवा भाषांतर करण्याची चर्चा होत आहे. यावर ऋषभने उत्तर दिले आहे. तो म्हणाला, 'मी असे करण्याची कल्पना देखील करू शकत नाही. जेव्हा मी लिहितो, तेव्हा जे मी पाहिले आहे ती पार्श्वभूमी निवडतो. कांतारा बघितला तर ती एक साधी कथा आहे. एक नायक आणि एक खलनायक आहे, त्यात एक प्रेमकथा आहे आणि इतर गोष्टी आहेत. नवीन काय आहे ते म्हणजे पार्श्वभूमी, कथेचा स्थर आणि पॅकेजिंग. हे सर्व एकत्र येतात तेव्हा चित्रपट तयार होतो. ही माझ्या गावाची गोष्ट आहे, मी लहानपणापासून पाहिलेली गोष्ट आहे, म्हणून मी ती सादर केली. मी नेहमी म्हणतो, 'अधिक प्रादेशिक, अधिक सार्वत्रिक'. त्यामुळे, एखाद्या चित्रपट निर्मात्याला त्यांच्या प्रदेशातील ही भावना, ही संस्कृती सापडली आणि कथेचे सादरीकरण केले, तर कदाचित ते कामी येईल. पण नेहमीच असे होईल हे सांगता येत नाही.' (Movie)

अधिक प्रादेशिक हे अधिक सार्वत्रिक आहे, असे जेव्हा ऋषभ म्हणतो तेव्हा त्याला असे बोलायचे असते की, एखाद्याच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करून आपला स्वतःचा प्रदेश आणि आपल्याला माहित असलेले जग आपल्याला जास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्याची मोठी संधी देते. हा दृष्टिकोन बॉलिवूड चित्रपट निर्माते आजकाल विसरत आहेत. आम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो, स्वतःसाठी नाही. आपण प्रेक्षकांना आणि त्यांच्या भावनांना लक्षात ठेवले पाहिजे. त्यांची मूल्ये आणि जीवनपद्धती काय आहे हे बघावे लागते. मी चित्रपट निर्माता होण्यापूर्वी तिथे होतो. पण आता, पाश्चात्य संस्कृती, हॉलिवूड यांचा प्रभाव आणि वापरामुळे चित्रपट निर्माते भारतातही तशाच आशयाच्या कथा पडद्यावर आणायचा प्रयत्न करीत आहेत. पण तुम्ही असा प्रयत्न का करत आहात? हॉलिवूडमुळे लोकांना ते आधीच मिळत आहे आणि ते दर्जेदार कथाकथन उत्तम कामगिरी करत आहे.' (Hollywood )

2022 मध्ये फार कमी हिंदी चित्रपट यशस्वी झाले असल्याने त्याचे हे म्हणणे योग्य असू शकते. गंगूबाई काठियावाडी, द काश्मीर फाइल्स, भूल भुलैया 2, ब्रह्मास्त्र हे बॉलिवूडचे हिट चित्रपट भारतीय संस्कृतीवर, भावनांवर आधारित होते. ऋषभ म्हणतो की, वेबसीरीजचा वाढत चाललेल्या प्रभावामुळे भारतीय चित्रपटांमध्ये हा फोकस असणे आणखी महत्त्वाचे झाले आहे. 'आता, ओटीटीवर, तुम्हाला ते (वेस्टर्न कंटेंट) बर्‍याच भाषांमध्ये अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. पण तुम्हाला तिथे काय मिळत नाही तर ती माझ्या गावाची गोष्ट. ती मूळ प्रादेशिक कथा अशी आहे, जी तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही. तुम्ही कथाकार आहात आणि तुमच्या प्रदेशात कथा आहेत. तेच तुम्हाला लोकांसमोर आणण्याची गरज आहे,' हा सल्ला ऋषभने सध्याच्या चित्रपट निर्मात्यांना दिला आहे. (Bollywood)

सप्तमी गौडा, किशोर आणि अच्युथ कुमार यांच्याही भूमिका असलेल्या कांताराने जगभरात बॉक्स ऑफिसवर 325 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मूळ कन्नड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्यांनी डब करण्यात आला होता. हिंदीत डब केलेल्या कांतारानेच फक्त 53 कोटी कमावले आहेत. हा चित्रपट या वर्षातील सर्वात जास्त कमाई केलेला भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT