Actress Death Threat: बॉलिवूड अभिनेत्री आहाना कुमरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या अभिनयामुळे नव्हे तर पवन सिंहच्या चाहत्यांकडून आलेल्या मृत्यू आणि बलात्काराच्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. रिअॅलिटी शो “राईज अँड फॉल” (Rise & Fall) दरम्यान घडलेल्या घटनेनंतर तिने एका मुलाखतीत या गंभीर गोष्टींचा खुलासा केला आहे.
आहाना एका मुलाखतीत म्हणाली की शोच्या दरम्यान काही वेळा तिचा आणि भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांचा मतभेद झाला होता. त्या प्रसंगानंतर सोशल मीडियावर तिच्याविरुद्ध प्रचंड ट्रोलिंग सुरू झाले. “शो संपल्यानंतर मला पवन सिंहच्या चाहत्यांकडून अत्यंत घृणास्पद आणि भयावह संदेश मिळू लागले. काहींनी तर मला मृत्यूची आणि बलात्काराची धमकी दिली, “मी शोमधून बाहेर पडल्यावर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. माझ्याकडे शेकडो धमकीचे मॅसेज आले. काही लोक इतका द्वेष का बाळगतात, हे समजण्याच्या पलीकडचं आहे. आपण कोणत्या काळात जगतोय आणि आपल्या आजूबाजूला काय घडतयं यामध्ये फरक आहे.
आहाना कुमराने सांगितले, मी सर्व धमक्यांचे स्क्रीनशॉट काढून शोच्या निर्मात्यांना आणि टीमला पाठवले आहेत. “टीमने मला आश्वासन दिलं की अशा गोष्टींवर कारवाई केली जाईल. पण तरीही मला भीती वाटते कारण अशा प्रकारचे ऑनलाईन अटॅक मानसिक त्रास देतात,”
या वादानंतर आहाना आणि पवन सिंह यांच्यात स्टेजवरच वाद मिटल्याचे सांगितलं जातं. दोघांनी एकमेकांची माफी मागून शोमध्ये पुन्हा शांतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण चाहत्यांचा आक्रोश मात्र थांबला नाही. राईज अँड फॉल हा शो प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. यात आहाना कुमरा, पवन सिंह, धनश्री वर्मा, अशनीर ग्रोव्हर यांसारख्या व्यक्ती सहभागी होत्या. शोमधील सततचे वाद, स्पर्धात्मक स्वरूप आणि वादग्रस्त संवादांमुळे हा शो चर्चेत राहिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.