Marathi Movie Khillar Poster Out  Saam TV
मनोरंजन बातम्या

Khillar Movie Poster Launch: बैलगाडा शर्यतीचा थरार.. रिंकू सोबत दिसणार ललित प्रभाकरचा गावरान अंदाज, सर्वांना उत्सुकता

Marathi Movie On Bailgada Sharyat: 'खिल्लार' चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं.

Pooja Dange

Rinku Rajguru-Lalit Prabhakar Coming Together In Khillar: महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा धुराळा चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या 'खिल्लार' या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे 'खिल्लार' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी 'खिल्लार' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं.

येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल.

मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेला रिंगण हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर मकरंदनं यंग्राड, कागर, सोयरीक, पोरगं मजेतंय असे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मुळचे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने मकरंद यांनी बैलगाडा शर्यतींचं वातावरण अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय ते 'खिल्लार' चित्रपटातून मांडत आहे.

रिंकू राजगुरूने त्यांच्या कागर या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यामुळे मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे.

चित्रपटाविषयी मकरंद माने म्हणाला, की बैलगाडा शर्यतीचा विषयच अगदी जिव्हाळाचा आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ पडद्यावर रंगवताना 'खिल्लार'मधून मैदान जोरदार रंगणार माझी खात्री आहे.

बैलगाडा शर्यतीचे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. ही शर्यत खूप मनाची समजली जाते. काही काळासाठी बैलगाडा शर्यत बंद करण्यात आली होती. गेल्यावर्षी पुन्हा अधिकृतरीत्या ही शर्यत सुरु करण्यात आली आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT