Rinku Rajguru: अकलूजची कन्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने अगदी कमी वयात प्रेक्षकांच्या मनात हक्कचं स्थान निर्माण केल आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. रिंकू राजगुरुने "सकाळ" प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्याविषयी, आई-वडिलांबरोबरच्या नात्याविषयी आणि अभिनय कारकिर्दीबद्दल खास गप्पा मारल्या.
रिंकू म्हणाली की, चित्रपटसृष्टीतील सगळं फिल्मी जगण्यामागे खरे आयुष्य खूप साधं आहे. शूटिंगनंतर ती अकलूजला गेल्यावर आई-वडिलांसोबत वेळ घालवते, प्राण्यांसोबत राहते, वाचन करते आणि चित्रपट पाहते. सकाळ-संध्याकाळच्या चहापासून जेवणापर्यंत सगळं कुटुंबीयांसोबत असतं.
तिचे आई-वडील दोघेही शिक्षक असून त्यांच्याकडून मिळालेला आधार आणि संस्कार तिला मोठं बळ देतात. रिंकू सांगते, "आई-बाबांनी कधीही बंधनं घातली नाहीत. त्यांचा नेहमी मला दिला आहे की, तुला एखाद काम आवडतंय तरच कर, नसेल आवडत तर करू नकोस. कुठल्याही कामात आनंद नसेल तर त्याचा काही उपयोग नाही."
रिंकू म्हणते, "माझ्या आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की हे कर किंवा करू नको. त्यांचा विश्वास माझ्यावर आहे. मी मात्र दिवसभरात घडलेली सगळी माहिती आईला फोनवरून सांगते. कोणाला भेटले, कोणता चित्रपट साइन केला हे सगळं तिला कळतं." असं सांगून रिंकूने मुलाखतीचा शेवट केला आणि चाहत्यांना एक संदेश दिला की, "काम नेहमी तिथेच करावं जिथे आनंद मिळतो. फक्त नाव किंवा प्रसिद्धीसाठी काही करण्यापेक्षा समाधान महत्वाचं आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.