Ali Fazal-Richa Chadha Wedding Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Richa-Ali Wedding: चाहत्यांकडून मिळतोय प्रेमाचा वर्षाव, रिचा-अलीच्या लग्नाची ही अनोखी पत्रिका व सजावट

निसर्गप्रेम असल्याने टाकाऊ गोष्टींपासून आणि पुनर्वापर केलेल्या लाकडांचा वापर करत साध्या आणि पर्यावरणपूरक सजावटीचा प्रयत्न केला जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फैजल (Ali Fazal) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिचा नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असते. नुकतेच तिने काही दिवसांपूर्वी बॉयकॉट ट्रेंडवर (Boycott Trend) आपले मत मांडले होते आणि सोबतच त्या विधानाची चांगली चर्चाही रंगली होती. चर्चा आहे रिचाच्या लग्नाची. याआधी तिच्या लग्नाच्या स्थळासोबतच लग्नाची तारखेचीही चर्चा रंगली होती.

रिचा आणि अली यांचे लग्न कोणत्या पद्धतीने होणार याविषयी अनेक तर्क लावले जात होते. मात्र, आता या दोघांच्या बहुप्रतिक्षित लग्नाबाबत माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे इकोफ्रेंडली पद्धतीने लग्न करणार आहेत. रिचा आणि अली यांचे निसर्गप्रेम पाहता अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचा विचार केला आहे. अनेक व्यासपीठांवरुन पर्यावरण संवर्धनाविषयी त्यांनी आपले मतं मांडले आहे.

निसर्गप्रेम असल्याने टाकाऊ गोष्टींपासून आणि पुनर्वापर केलेल्या लाकडांचा वापर करत साध्या आणि पर्यावरणपूरक सजावटीचा प्रयत्न केला जाणार आहे. कार्यक्रमात अनेक गोष्टींची नासाडी होणार नाही यावर अधिक भर दिला जाईल. तसेच मुख्य बाब म्हणजे लग्नात प्लास्टिक वापरावर ही वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जाणार आहे. इकोफ्रेंडली पद्धतीने म्हणजे लग्नाच्या सजावटीसाठी सर्व साहित्य पर्यावरणपूरक असणार आहेत.

रिचा- अलीच्या लग्नाच्या पत्रिकेची जबरदस्त चर्चा सध्या सोशल मिडीयावर होत आहे. पत्रिकेच्या फोटोवर दोघेही सायकलवर असून पत्रिकेची डिझाईन माचिसच्या बॉक्स सारखी आहे. माचिस डिझाईन नव्वदच्या दशकातील आहे. रिचा- अलीचे लग्न येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत पार पडणार असून ३० सप्टेंबरपासून लग्नाचे सर्व विधी पार पडणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT