Celebrity Demamad Arrest To UP Teacher Saam TV
मनोरंजन बातम्या

Celebrity Reaction On UP Incident: तिला तुरुंगात टाका... विद्यार्थ्याला मारहाण केलेल्या शिक्षिकेच्या विरोध कलाकारांचा संताप

UP Teacher Arrest: रेणुका शहाणे, प्रकाश राज आणि स्वरा भास्कर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शिक्षिकेच्या अटकेची मागणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Renuka Shahane, Prakash Raj, Swara Bhaskar On UP Teacher:

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका शिक्षिकेने मुलासोबत केलेले कृत्य पाहून सर्वसामान्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींही संतापले आहेत. रेणुका शहाणे, प्रकाश राज आणि स्वरा भास्कर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शिक्षिकेच्या अटकेची मागणी केली आहे.

एका UKG विद्यार्थ्याला ५चा पाढा येत नव्हता, त्यामुळे शिक्षिकेने वर्गातील इतर विद्यार्थ्यांना त्याला मारायला सांगितले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जो कोणी तो व्हिडीओ पाहतोय त्याचा संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनीही आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ मुझफ्फरनगरच्या खुब्बापूर गावातील नेहा पब्लिक स्कूलचा आहे.

या शाळेच्या UKG वर्गात शिकणाऱ्या एका लहान विद्यार्थ्याला 5 चा पाढा आला नाही म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याला भयानक शिक्षा दिली. तिने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्याला कानाखाली मारायला लावले आणि नंतर मारहाण देखील करायला सांगितले.

व्हिडिओमध्ये शिक्षक एका विशिष्ट धर्माबद्दल काही कमेंट करत असल्याचा आरोपही आहे. शिक्षकाने मारहाण केलेला मुलगा मुस्लिम असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ पाहून सेलेब्स खूप संतापले आहेत. (Latest Entertainment News)

रेणुका शहाणेने ट्विट करत लिहिले आहे की, 'त्या नीच शिक्षिकेला तुरुंगात टाकावे! त्याऐवजी, तिला राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळू शकतो! राडा माझ्या प्रिय देशवासीयांनो.

स्वरा भास्करने देखील शिक्षकाच्या अटकेची मागणी केली आणि ट्विट केले आहे. तसेच तिने हिंदू आणि बीजेपीला बोल सुनावले आहेत.

प्रकाश राज यांनी देखील यावर संताप व्यक्त केला आहे. 'मानवतेचा काळा ठप्पा' असे त्यांनी म्हटले आहे.

प्रत्येक मुद्द्यावर आपले स्पष्ट मत मांडणारे प्रकाश राज यांनीही या घटनेचा निषेध केला आणि हा मानवतेचा 'काळा ठप्पा' असल्याचे म्हटले.

प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर फोटो कोलाज शेअर करत लिहिले की, 'आम्ही मानवतेच्या सर्वात काळ्या बाजूकडे वाटचाल करत आहोत. आम्ही घाबरत नाही का?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

SCROLL FOR NEXT