Renowned Classical Singer Chhannulal Mishra Passes Away at age 91 due to old age on 2nd October  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Classical Singer Death: दसऱ्याच्या दिवशी संगीतविश्वात शोककळा; प्रसिद्ध शास्त्रीय गायक काळाच्या पडद्याआड

Classical Singer Passes Away: प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांचे ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Classical Singer Passes Away: प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांचे ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. बनारस घराण्याची ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती आणि भजन या शैलींमध्ये अप्रतिम प्रभुत्व मिळवलेले हे स्वरसम्राट केवळ गायक नव्हते, तर भारतीय संगीताच्या समृद्ध परंपरेचे जिवंत प्रतीक होते.

गायकीचे वैशिष्ट्य

पंडित छन्नूलाल मिश्र यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आजमगढ येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची गोडी लागली आणि त्यांनी घरातील परंपरेनुसार सुरांचे शिक्षण घेतले. पुढे किराना घराण्याच्या शास्त्रीयतेचा गाभा आणि बनारस घराण्याची भावपूर्ण शैली या दोन्हींचा संगम करून त्यांनी स्वतःची अनोखी गायकी शैली घडवली. त्यांच्या ठुमरीत एकाच वेळी लावण्य, शृंगार आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळे. त्यांच्या गायनात अलापांची खोली, सूरांचा नितळपणा आणि शब्दांच्या माधुर्याची वेगळी ताकद होती. ‘पूरब अंग ठुमरी’चे ते मान्यवर कलाकार मानले जातात. त्यांनी लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम संगम साधत, श्रोत्यांना एका क्षणात बनारसच्या घाटांवर नेऊन ठेवले. त्यांच्या होरीत व चैतीत बनारसची रंगत जिवंत व्हायची.

पुरस्कार आणि सन्मान

पंडित छन्नूलाल मिश्र यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि २०२० मध्ये पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे बनारस घराण्याच्या गायकीला जागतिक पातळीवर नवा दर्जा मिळाला.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर गायक छन्नुलाल मिश्रा यांचा फोटो शेअर केला. पंतप्रधानांनी लिहिले की, "प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित छन्नुलाल मिश्रा यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी भारतीय कला आणि संस्कृतीच्या समृद्धीसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीत जनतेपर्यंत पोहोचवले नाही तर जागतिक स्तरावर भारतीय परंपरा प्रस्थापित करण्यातही अमूल्य योगदान दिले. त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच मिळाल्याबद्दल मी भाग्यवान आहे. २०१४ मध्ये ते वाराणसी मतदारसंघासाठी माझे प्रस्तावक देखील होते. या दुःखाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT