Reem Shaikh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Reem Shaikh: 'दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत लग्न दूरच प्रेमही करू शकणार नाही', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं कारण; म्हणाली...

Reem Shaikh: अभिनेत्री रीम शेखने स्पष्ट केले आहे की, ती दुसऱ्या धर्मातील कोणत्याही मुलाच्या प्रेमात पडणार नाही किंवा त्याच्याशी लग्न करणार नाही. आपल्या धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीसोबत राहणे तिला शक्य होणार नाही.

Shruti Vilas Kadam

Reem Shaikh: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रीम शेख सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सहभागी होत तिने प्रेमसंबंध आणि लग्नाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. विशेषतः आंतरधर्मीय विवाहाविषयी बोलताना तिने थेट सांगितले की, ती वेगळ्या धर्माच्या व्यक्तीच्या प्रेमात पडणार नाही किंवा त्याच्याशी लग्न करणार नाही.

शार्दुल पंडितच्या पॉडकास्टमध्ये झालेल्या संवादात यावेळी तिला विचारण्यात आले की, कुटुंबात आंतरधर्मीय विवाह असूनही स्वतःच्या आयुष्यात असा निर्णय घेतल्यास अडचणी येतील का? यावर उत्तर देताना रीमने सांगितले की, हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते; मात्र ती स्वतः अत्यंत धार्मिक वृत्तीची आहे.

ती म्हणाली की, “मी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करते आणि माझ्या धार्मिक आचारांचे काटेकोर पालन करते. त्यामुळे माझ्या धर्माबाहेर लग्न करणे मला शक्य नाही.” तिच्या मते, ज्या व्यक्तीचा धर्म वेगळा आहे, त्याच्यासोबत आयुष्य घालवणे तिला अवघड जाईल. तसेच अशा निर्णयामुळे समाजातील टीकेलाही सामोरे जावे लागू शकते, असेही तिने स्पष्ट केले.

रीमने पुढे सांगितले की, रमजानमध्ये ती नियमित रोजे पाळते आणि आयुष्यातील कठीण प्रसंगी प्रार्थनेतूनच तिला आधार मिळतो. त्यामुळे तिच्या श्रद्धा आणि जीवनशैलीशी जुळणारा जोडीदार असणे तिच्यासाठी महत्त्वाचे आहे.

दरम्यान, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना तिने तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा उल्लेखही केला. तिच्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणं होत असल्यामुळे बालपण कठीण गेल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे, तिच्या पालकांचे आंतरधर्मीय लग्न झाले होते आई हिंदू तर वडील मुस्लिम आणि त्यांच्या घरी दोन्ही धर्मांचे पालन होत असे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, रीम शेख गेल्या वर्षी 'लाफ्टर शेफ्स' या कार्यक्रमात दिसली होती. तिने एक वेब सिरीज आणि चार म्युझिक व्हिडिओ देखील प्रदर्शित केले. सध्या, रीमने तिच्या पुढील कामाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Manoj Jarange : उपोषणाचा तिसरा दिवस अन् अचानक वाढली शुगर! जरांगे पाटलांचा सरकारवर मोठा आरोप; काय म्हणाले डॉक्टर?

Maharashtra News Live Update: पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT