divya shinde on big boss  Saam tv
मनोरंजन बातम्या

मरण पत्करेन, पण माफी मागणार नाही; बिगबॉसमधून बाहेर पडताच दिव्या शिंदे काय बोलून गेली?

divya shinde on big boss : बिगबॉसमधून बाहेर पडताच दिव्या शिंदेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिच्यावर झालेले आरोप दिव्या शिंदेने फेटाळून लावले आहेत.

Vishal Gangurde

दिव्या शिंदेने पत्रकार परिषद बाजू मांडली

माफी मागणार नसल्याचे दिव्याने स्पष्ट केले

दिव्याने तलवारीचा अर्थ सांगितला

'माझ्या विरोधात काहींनी पोस्ट टाकल्या आहेत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी बिगबॉसला विनंती करावी की, त्यांनी पूर्ण क्लिप दाखवावी. माझं वाक्य बिगबॉसला पूर्ण ऐकण्यासाठी बोलत होते. त्यांनी महाराष्ट्राला अर्ध वाक्य दाखवलं. त्यांनी इतर स्पर्धकांशी सुरू असलेला संवाद महाराष्ट्राला दाखवावा, अशी विनंती दिव्याने केली. बिगबॉसमधून बाहेर पडलेली रिलस्टार दिव्या शिंदे सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिगबॉसच्या घरात तलवारीची भाषा वापरल्याने दिव्या शिंदेला घरातून काढून टाकण्यात आलं होतं. दिव्या शिंदेने शो सोडताना स्पर्धकांची माफी मागितली होती. आता बिगबॉसमधून बाहेर पडल्यानंतर तलवार शब्द दुसऱ्या हेतूने वापरल्याचा दावा दिव्या शिंदेने केला आहे. 'मरण पत्कारेन. पण माफी मागणार नाही, असं म्हणत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिव्या शिंदेने सांगितले.

रिलस्टार दिव्या शिंदेने आज बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिव्या शिंदेने तिच्यावरील आरोप खोडून काढले. दिव्या शिंदे म्हणाली, ' तलवार म्हणजे वैचारिक. ही तलवार म्हणजे शाब्दिक, ही तलावर म्हणजे मान सन्मानाची आहे. जो वर्ग मला ऐकत आला आहे, त्याला माझ्या तलवार शब्दाचा अर्थ माहीत आहे. मी लेखक आहे. मला शब्द कसे वापरावेत, हे चांगलं माहीत आहे'.

'माझ्या विरोधात काहींनी पोस्ट टाकल्या आहेत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी बिगबॉसला विनंती करावी की, त्यांनी पूर्ण क्लिप दाखवावी. माझं वाक्य बिगबॉसला पूर्ण ऐकण्यासाठी सांगत होते. त्यांनी महाराष्ट्राला अर्ध वाक्य दाखवलं. त्यांनी इतर स्पर्धकांशी सुरू असलेला संवाद महाराष्ट्राला दाखवावा, अशी विनंती दिव्याने केली.

माझी तलवार शा‍ब्दिक - दिव्या

'माझी तलवार शा‍ब्दिक आहे. ही तुमच्या मानेवर लटकलेली असेल. मी काही शब्द उच्चारणे टाळले. मी खेळाडू म्हणून बिगबॉसमध्ये पोहोचले होते. प्रत्येक दिवशी मला भाषणासारखी बोलते, अशी टीका व्हायची. त्यांच्या बोलण्याने मला माननाणारा वर्ग नाराज होऊ नये, यासाठी मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना भाषणावरून टीका करू नका, असं सांगत गेले, असं दिव्या पुढे म्हणाली.

'तू जास्त समजावून सांगते, असे एका स्पर्धकाने म्हटले. त्यावेळी तिला म्हटलं की, मी २० वर्षांपासून चळवळीत आहे. मला चळवळीतील शब्दांची सवय लागली आहे. त्यामुळे जास्त समजावून सांगते,असेही तिने स्पष्ट केले.

माफी मागणार का?

बिगबॉसमध्ये केलेल्या वक्तव्यावर दिव्या शिंदे म्हणाली, 'मरण पत्करेन. पण माफी मागणार नाही. महाराष्ट्राला मी चुकीची वाटत असेल, तर माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही एका किल्ल्यावरून कडेलोट करा. परंतु मी माफी मागणार नाही. मी अपमानाला सामोरे जाणार नाही. मी जे बोलले, त्याची जबाबदारी घेते, असे तिने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

South Indian Chutney: वरण भातासोबत खा 'ही' साउथ इंडियन चटणी, झटपट वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: आरक्षण मागणीसाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात बैठकासत्र; मनोज जरांगे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये

Chanakya Niti: तोंडावर गोड बोलणाऱ्या धोकेबाज लोकांना कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितली तब्बल 8 सुत्र

'लाडकी'च्या खात्यात 6 हजार येणार? महिला वर्गात आनंदाचे वातावरण

Kolhapur To Mumbai Flight: मुंबई ते कोल्हापूर प्रवास आता फक्त एक तासाचा; दिवसातून दोनवेळा विमानाचे उड्डाण, जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT