Red Soil Stories Fame Pooja Gawas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Death News: 'रेड सॉईल स्टोरीज'च्या पूजा गवसवर दुःखाचा डोंगर; पतीनंतर अवघ्या सहा महिन्यांत जवळच्या व्यक्तीचं निधन

Red Soil Stories Fame Pooja Gawas: पतीनंतर अवघ्या सहा महिन्यांत वडिलांचंही निधन ‘रेड सॉईल स्टोरीज’च्या पूजा गवसवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Shruti Vilas Kadam

Red Soil Stories Fame Pooja Gawas: ‘रेड सॉईल स्टोरीज’ या लोकप्रिय युट्यूब चॅनेलमधून कोकणातील पारंपरिक पाककृती, संस्कृती आणि गावकरी जीवनाची साद प्रभावीपणे देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या पूजा गवसनं आपल्या आयुष्यातील एका अत्यंत दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आधी पतीनंतर आता वडिलांचाही निरोप


पूजाच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काळात अनेक दु:ख भरले आहेत. ऑगस्ट 2025 मध्ये तिच्या पती शिरीष गवस यांचे ब्रेन हॅमरेजमुळे दुःखद निधन झाले होते. ज्यामुळे ती मोठ्या दु:खात होती. या दु:खातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना, आता पूजा गवसला आणखी एक दुःखद बातमी देण्यात आली. तिचे वडील गेल्या काही काळापासून कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देताना अखेर त्यांचं निधन झालं आहे. पूजाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून ही दुःख बातमी चाहत्यांना दिली. ज्यावर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

भावनिक पोस्टमध्ये काय म्हटलं?
पोस्टमध्ये पूजा गवसनं आपल्या भावनांना शब्द दिले आहेत. तिने लिहिले की, "प्रिय पप्पा, अखेर तुम्ही सुद्धा सोडून गेलात. आधी श्रीजाने तिचा बाबा गमावला आणि आता तिचे आजोबा. आता कुठे एका वादळातून किनारा गाठण्याचा प्रयत्न सुरू होता आणि नशिबाने दुसरे चक्रीवादळ पुढ्यात आणून ठेवले..." 

तिने पुढे लिहिले की, ११ वर्ष तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज दिलीत. ती सुद्धा न डगमगता न हार मानता. खर सांगू जेव्हा शिरीषच्या आजाराबद्दल पहिल्यांदा कळला तेव्हा सर्वात आधी तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर आला होतात. वाटलेला तुम्ही इतके वर्ष आजाराशी दोन हात करताय मग शिरीषला सुद्धा काहीच होणार नाही. पण आज सगळेच विचार, सगळे निश्चय हरले. या आजाराच्या कितीतरी जीवघेण्या यातना तुम्ही कसलीच तक्रार न करता सहन केल्या. तुमची आलेल्या परिस्थितीशी लढण्याची ताकद माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील. माझं विचारांनी दाटलेला मन मोकळं करण्यासाठी रोज संध्याकाळी मी आणि श्रीजा तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचो. पण आता तो मार्ग सुद्धा देवाने कायमचा बंद केला. या सगळ्यासाठी देवा तुझे किती आभार मानू..अजून काय काय लिहून ठेवलयस माझ्या साठी ते एकदाच सांगुनच टाक. तू दुःख देत राह पण ते पेलण्याची ताकद सुध्दा तूच दे. तुमच्या आजारपणात ज्या खंबीरपणे तुम्हाला मम्मीने साथं दिलीये तोच खंबीरपणा घेऊन मी जगायचं ठरवलंय.. काही झालं तरी हार मानायची नाही हे शिकवण तुम्ही दोघांनी दिलीये. जोपर्यंत श्वास घेतोय तोपर्यंत लढत रहायचं. पपा.. जिथे कुठे असाल सुखात राह. कायम पाठीशी राहा. शिरीषशी भेट झाली तर त्याला सांगा आम्ही आमची काळजी घेतोय..तू निश्चिंत रहा.. आम्हाला आशीर्वाद देत राह. तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मुंबईत अर्धनग्न अवस्थेत नशा, ड्रग्ज पार्टीचे 'कल्याण कनेक्शन'; नेस्कोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update : नेक्सो सेंटरमधील ड्रग्स पार्टीच्या प्रकरणात एकाला अटक

Nail Colours Designs: उन्हाळ्यात नखांचे सौंदर्य वाढवतील 'हे' 5 नेल कलर्स

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला बनणार ५ राजयोग; या राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

Amravati Crime: अमरावतीत १८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

SCROLL FOR NEXT