Raveena Tandon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Upcoming Film: PM मोदींच्या भूमिकेत हा सुपरस्टार दिसणार; तर रवीना टंडन साकारणार आईची भूमिका, सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

Raveena Tandon: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनला एक मोठी आणि जबाबदार भूमिका मिळाली आहे. तिच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेनची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Shruti Vilas Kadam

Raveena Tandon: बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनची सध्या खूप प्रशंसा होत आहे. "आर्यनक" या मालिकेपासून, अभिनेत्रीला अनेक प्रोजेक्ट मिळाले आहेत. तसेच २०२३ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आता, अभिनेत्रीला आणखी एका मोठी प्रमुख भूमिका साकारणार आहे. ती पंतप्रधान मोदींच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या जीवनाचे वर्णन करणाऱ्या चित्रपटात त्यांच्या आई हिराबेन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अधिक अपडेट्स जाणून घेऊयात.

या चित्रपटात पंतप्रधान मोदींची भूमिका कोण साकारणार हे देखील उघड झाले आहे. पंतप्रधान मोदींवरील मागील चित्रपटात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होते, परंतु तो चित्रपटगृहांमध्ये चांगला चालला नाही. आता, मोदींच्या जीवन प्रवासावर आणि त्यांच्या आईच्या योगदानावर लक्ष केंद्रित करणारा चित्रपट येत आहे. या चित्रपटात कोणता अभिनेता पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार आहे ते जाणून घेऊया.

माहितीनुसार, रवीना टंडन ही भूमिका साकारण्यास उत्सुक आहे आणि ती पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका साकारण्यास खूप उत्सुक आहे. ही कथा पूर्णपणे आई-मुलाच्या नात्यावर आधारित असेल. यात पंतप्रधान मोदींच्या आईने आपल्या मुलाचे जीवन सुधारण्यासाठी सहन केलेल्या त्याग आणि संघर्षाचे चित्रण केले जाईल. रवीना या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे.

चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका कोण करणार?

या चित्रपटात मल्याळम अभिनेता उन्नी मुकुंदन पंतप्रधान मोदींची मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने त्याने चाहत्यांची मने आणि निर्मात्यांचा विश्वास जिंकला आहे. आता, तो एक मोठी जबाबदारी घेत आहे. तो भारताचे पंतप्रधान यांची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारमधील विजयाचा अकोला भाजपकडून जल्लोष

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवलीचा विकास झटपट होणार; खटाखट मिळणार बांधकाम परवानग्या, नेमकी यंत्रणा काय?

Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार, शेख हसीनांना फाशीची शिक्षा होणार?

Online Payment Safety: ऑनलाइन शॉपिंग करताना फ्रॉड होण्याचा धोका वाटतोय? 'या' सोप्या टिप्सनं सुरक्षितपणे करा डिजिटल व्यवहार

Maharashtra Live News Update: नवले पुलाबाबत उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT