Apurva Nemlekar saam tv
मनोरंजन बातम्या

Apurva Nemlekar : 'व्हॅलेंटाइन डे'ला प्रसिद्ध अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण? पाहा PHOTOS

Apurva Nemlekar Wedding : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने 'व्हॅलेंटाइन डे' लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करून तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Shreya Maskar

'व्हॅलेंटाइन डे' ला प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली.

अभिनेत्रीने नुकतेच लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

'रात्रीचा खेळ चाले' या मालिकेतून अभिनेत्रीला खूप लोकप्रियता मिळाली.

मनोरंजन सृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे.'रात्रीचा खेळ चाले' या मालिकेत 'शेवंता'ची भूमिका करणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर विवाह बंधनात अडकली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना हा सुखद धक्का दिला आहे. तिने आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे.

अपूर्वा नेमळेकरच्या नवऱ्याचे नाव तनुज गोवळकर असे आहे. आता अपूर्वा गोवळकरांची सून झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर लग्न सोहळ्याचे तीन फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोंना अपूर्वाने खूपच खास, भावनिक कॅप्शन लिहिलं आहे. ती खूपच खुश आहे. अपूर्वा आणि तनुज एका खास दिवशी लग्न केले आहे. अपूर्वा आणि तनुजचा विवाह 'व्हॅलेंटाईन्स डे'ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला पार पडला. या सोहळ्याला तिचे कुटुंब आणि जवळचे मित्र मंडळी उपस्थित होते.

लग्नाचा लूक

अपूर्वाने लग्नासाठी खूपच भारी लूक केला होता. तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, केसांचा बन, मराठमोळा साज श्रृंगार, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र अपूर्वा खूपच सुंदर दिसत होती. तर तनुजने पांढरा कुर्ता आणि हिरव्या रंगाचे धोतर नेसले होते. दोघांचा हा मराठमोळा पारंपरिक लूक खूपच सुंदर दिसत होता. अपूर्वा नेमळेकरचे हे दुसरं लग्न आहे.

वर्कफ्रंट

अपूर्वा नेमळेकरला 'रात्रीस खेळ चाले' मधून खूप लोकप्रियता मिळाली. तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. यात 'प्रेमाची गोष्ट', 'शुभविवाह', 'आभास हा' यांचा समावेश आहे. अपूर्वा नेमळेकर 'बिग बॉस मराठी सीझन 4' ची उपविजेता देखील ठरली होती. आता चाहते अपूर्वा नेमळेकरच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT