Todays Horoscope: 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी 'या' राशींना प्रेमाचे लाभ मिळतील, जाणून घ्या राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

संतती उत्सुक असणाऱ्या जातकांना आनंद वार्ता मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.

वृषभ

एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी मध्यस्थी होऊन घरातील सर्वांना आपल्या निर्णयाप्रत आणावे लागेल. कामात मग्न राहाल.

मिथुन

आजच्या दिवशी खास प्रेमाचे लाभ मिळतील. एखादी महत्त्वाची गोष्ट जी आपल्या आयुष्यात मोहर उठवेल.

कर्क

पूर्वजांच्या आशीर्वादाने आयुष्य चांगले जात आहे हे जाणवेल. धन योगाची चांगली शक्यता आहे.

सिंह

दानत आणि उदारता वाढेल. इतरांचे पोशिंदे व्हायला आवडणार आहे.

कन्या

करियरमध्ये धावपळ, दगदग होण्याची शक्यता आहे. मनस्थिती मात्र हेतू पुरस्कार शाबूत ठेवावी लागणार आहे.

तूळ

जोडीदाराविषयी तरल भावना निर्माण होणार आहे. एकोपाने राहण्याचा प्रयत्न कराल.

धनु

तुम्ही जोडलेल्या लोकांचे आशीर्वाद पाठीशी राहणार आहे. मोठे प्रवास घडतील.

मकर

शारीरिक मेहनत आज वाढेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कुंभ

कसून काम करावं लागणार आहे. मनासारख्या घटना घडतील.

मीन

चोर, चोरी यांपासून सावध रहावं लागणार आहे. नोकरीत स्वस्थता वाटेल.

ताजमहालातील बंद असलेल्या 'त्या' २२ खोल्यांमध्ये नेमकं आहे तरी काय?

येथे क्लिक करा