Rashmika-Vijay Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Wedding : फोटोंमधून सांगितली जाणार विजय-रश्मिकाची प्यारवाली लव्ह स्टोरी; संगीत समारंभाचा VIDEO व्हायरल

Rashmika-Vijay Sangeet Video : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या घरा लगीन घाई पाहायला मिळत आहे. त्यांच्या संगीत डेकोरेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

रश्मिका-विजय 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

रश्मिका आणि विजयच्या संगीत समारंभाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

रश्मिका आणि विजय साऊथ इंडस्ट्रीतील गाजलेले जोडपे आहे.

'विरोश' (VIROSH) च्या लग्नाआधीच्या समारंभांना सुरूवात झाली आहे. गेले अनेक वर्ष दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता अखेर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूरमध्ये शाही थाटात दोघे नवीन आयुष्याला सुरूवात करणार आहेत. रश्मिका-विजयच्या लग्नासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकार उदयपूरला पोहचले आहेत. अशात आता सोशल मीडियावर रश्मिका-विजयचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांच्या संगीत समारंभाची झलक पाहायला मिळत आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्न सोहळ्यातून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्यांच्या संगीत समारंभाची झलक पाहायला मिळत आहे. हा संगीत सोहळा खूपच खास असणार आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे फोटो पाहायला मिळत आहे. संगीत समारंभाचे डेकोरेशन खास दोघांच्या कपल फोटोंनी करण्यात आले आहे. त्यांच्या रोमँटिक फोटोंची झलक व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विजय आणि रश्मिकाचे अनेक सुंदर आणि गोड फोटो दिसत आहे. हे असे फोटो आहेत जे, रश्मिका-विजयने कधीही सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. व्हिडिओमध्ये कार सेल्फीपासून ते हॉलिडे एन्जॉयपर्यंत सर्व सुंदर क्षण पाहायला मिळत आहेत. फोटोंमध्ये एकमेकांना मिठी मारताना, रोमँटिक पोज देताना दोघे दिसत आहेत. या व्हिडिओ पाहून असे बोले जात आहे की, विजय आणि रश्मिकाच्या संगीत नाइटला फोटोंमधून त्यांची प्रेमकथा सर्वांना सांगितली जाणार आहे. 25 फेब्रुवारीला रात्री शानदार संगीत सोहळा पार पडणार आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली असून मजा-मस्ती करतानाचे फोटो दोघांनी शेअर केले आहेत. पूल पार्टी आणि व्हॉलीबॉल सामन्यांपासून ते विरोश प्रीमियर लीगपर्यंत सर्व फोटो पाहायला मिळाले. 'विरोश' (VIROSH) चे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT