Rashmika Mandanna Manager Saam TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Statement : रश्मिका मंदान्नाने मौन सोडले ; 80 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दिले स्पष्टीकरण

Rashmika Madonna's Clarification : रश्मिका मंदान्नाची 80 लाख रुपयांची फसवणूक झाली होती.

Pooja Dange

Rashmika Mandanna Spoke About Fraud Rumors : अभिनेत्री आणि संपूर्ण भारताची क्रश रश्मिका मंदान्नाची फसवणूक झाल्याची सध्या चर्चा आहे. रश्मिका मंदान्नाला 80 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. रश्मिकाला फसवणारी व्यक्ती अनोळखी नसून तिचा मॅनेजर होता. या प्रकरणानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.

रश्मिका मंदान्नाच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच हा मॅनेजर तिच्यासोबत आहे, असे सांगण्यात येत आहे. जेव्हा ही बातमीने मीडियामध्ये पसरू लागली तेव्हा दोघांनी अधिकृत निवेदन जाहीर केले. त्या निवेदनात म्हटले आहे की, वेगळे होण्याचा निर्णय त्यांच्या स्वेच्छेने घेतल्याचे सांगण्यात आला आहे. कोणीही कोणाला काढलेले नाही. (Latest Entertainment News)

'पिंकविला'ने दिलेल्या बातमीनुसार, रश्मिका मंदान्नाची 80 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. आता अधिकृत निवेदनात रश्मिका मंदान्ना आणि मॅनेजर दोघांनीही त्यांच्यामध्ये कोणतेही वैर नसल्याचे सांगितले आहे. तसेच दोघांनीही विभक्त होण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. रश्मिका मंदान्ना आणि तिच्या मॅनेजरने सांगितले की, विभक्त होण्याचा निर्णय कोणा एकाच नाही. त्यांनी एकत्रितपणे विभक्त होण्याचे ठरविले आहे.

रश्मिकाच्या मॅनेजरने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात लिहिले आहे की, 'आमच्यामध्ये कोणतेही मतभेत नाहीत. आम्ही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही का वेगळे होत आहोत या अफवांमध्ये तथ्य नाही. आम्ही पूर्णपणे प्रोफेशनल आहोत आणि आम्ही आतापासून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रश्मिका आणि तिच्या मॅनेजरने गुरुवारी 22 जून रोजी ही घोषणा केली आहे.

Rashmika Mandanna Statement

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये रश्मिकाला तिच्या मॅनेजरने 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा केला होता. याबाबत काही चर्चाही सुरू आहेत. यावरून तिला कोणताही वाद निर्माण करायचा नाही हे उघड आहे. त्यामुळे रश्मिका मौन बाळगून आहेत. मात्र आता निवेदनातून फसवणुकीमुळे मॅनेजरला हटवले नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट दोघांनी मिळून घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Vs Black Clay Pot: लाल की काळा, कोणत्या माठात पाणी राहील थंड?

Maharashtra Live News Update : परभणी जिल्हा परिषदेच्या ४ विशेष समित्यांची बिनविरोध निवड

मालेगाव महापालिकेत पुन्हा राडा; इस्लाम आणि MIM च्या नगरसेवकांची एकमेकांना धक्काबुक्की

पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूरसह उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपलं; शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनं पाण्यात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT