Vijay Deverakonda SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vijay Deverakonda : साखरपुड्यानंतर विजय देवरकोंडा पहिल्यांदाच दिसला; हातातील अंगठीनं वेधलं लक्ष, पाहा व्हायरल VIDEO

Vijay Deverakonda Viral Video : साखरपुड्यानंतर विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेत्याच्या हातातील अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने साखरपुडा केला आहे.

साखरपुड्यानंतर विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत विजय देवरकोंडाच्या हातात साखरपुड्याची अंगठी दिसत आहे.

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) गेले अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. दोन दिवसांपूर्वी रश्मिका आणि विजयने गुपचूप साखरपुडा केल्याची माहिती समोर आली होती. मात्र अद्याप आपल्या साखरपुड्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नसून सोहळ्याचे फोटो देखील शेअर केले नाही आहे. अशात आता विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो साखरपुड्याची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साखरपुड्यानंतर विजय देवरकोंडा कुटुंबासह श्री सत्य साई बाबांच्या महासमाधीला भेट देताना दिसला. विजय आणि त्याचा भाऊ आनंद देवरकोंडा यांनी यापूर्वी आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील श्री सत्य साई बाबा उच्च माध्यमिक शाळेत शालेय शिक्षण घेतले होते. व्हिडीओमध्ये विजय देवरकोंडा कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसत आहे. फुलांचा गुच्छ देऊन विजय देवरकोंडाचे स्वागत करण्यात येते. तेव्हा फुलांचा गुच्छ स्वीकारताना विजयच्या बोटात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळाली.

विजय देवरकोंडाच्या बोटात गोल्डन सिंपल रिंग पाहायला मिळाली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांचा 'गीता गोविंदम' चित्रपट खूप गाजला.

लग्नाची तारीख काय?

मीडिया रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. ते दोघे फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. चाहते या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांच्या डिनर डेटचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health: छातीत दुखणं हे हार्ट अटॅकचं लक्षण नाही; प्रमुख लक्षण वेगळंच, नेमकं त्याकडे आपण करतो दुर्लक्ष

Salher Fort History: नाशिक जिल्ह्यात वसलेला साल्हेर किल्ला माहितेय का? जाणून घ्या ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

Pawan Singh Controversy: 'वहिनीची दया येते...'; पवन सिंगच्या पत्नीच्या मदतीला आला 'हा' प्रसिद्ध अभिनेता, म्हणाला...

Rohini Khadse: रोहिणी खडसेंना पोलिसांना चौकशीसाठी का बोलावलं? महत्वाची माहिती समोर|VIDEO

Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सुईमध्ये धागा का घालतात?

SCROLL FOR NEXT