Rashmika-Vijay Viral Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika- Vijay Wedding News : रश्मिका आणि विजय लवकरच लग्न करणार? कुटुंबियांसोबतचा VIDEO व्हायरल पाहा

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda : नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Bollywood News : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna And Vijay Deverakonda) या जोडीला ऑनस्क्रीन पाहायला सर्वांनाच आवडतं. दोघांची सिनेमातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या खूप भावते. दोघे चांगले मित्र असल्याचंही त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे. पण त्यांच्या फॅन्सना दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं सतत वाटतं. त्यामुळे दोघांना अनेकदा याबाबत प्रश्नही विचारला जातो.

नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा दोघेही रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय आणि खास मित्रही उपस्थित होते. 'जागरण' या वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे.

रेस्टॉरंटच्या बाहेर दोन्ही कुटुंबांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत की काय असा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर तसे प्रश्नही विचारले. (Latest Entertainment News)

एका चाहत्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय चाहत्याने दोघांनाही त्यांचे नाते लपवू नका अशी विनंती केली आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की, दोघे एकमेकांना डेट करत आहेत आणि त्याची त्यांच्या कुटुंबियांनाही कल्पना आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे त्यांच्या फॅन्सचे अंदाज आहेत. मात्र दोघांनी याबाबत कधीही काही सांगितलेलं नाही.  (Celebrity)

विजय देवरकोंडा काही महिन्यांपूर्व बॉलिवूडमध्ये अनन्या पांडेसोबत 'लिगर' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. दुसरीकडे, रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा-द राइज' या चित्रपटातील भूमिकेच खूप कौतुक झालं. रश्मिका लवकरच रणबीर कपूरसोबत अॅनिमलमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT