Vijay Weds Rashmika Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Weds Rashmika: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा बार उडाला, उदयपूरमधील पहिला फोटो आला समोर

Vijay Weds Rashmika: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्न केले आहे. उदयपूरमध्ये सकाळी १०:१० वाजता तेलुगू पद्धतीनुसार या कपलने लग्न केल. आता कोडावा परंपरेनुसार सायंकाळी ४:३० वाजता पुन्हा लग्न करतील.

Shruti Vilas Kadam

Vijay Weds Rashmika: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नगाठ बांधली आहे. आतापर्यंत चाहते त्यांना फक्त रिल आयुष्यात एकत्र पाहून आनंदी होते, पण अखेर चाहत्यांचे हे आवडते कपल रियल आयुष्यात एकत्र आले आहे. त्यांनी सकाळी १०:१० वाजता उदयपूरमध्ये तेलुगू पद्धतीनुसार लग्न केले. या खास प्रसंगी फक्त काही जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. दोघेही खूपच सुंदर दिसत होते. विजयने रश्मिकाच्या बोटात अंगठीही घातली. आता हे कपल कोडावा परंपरेनुसार सायंकाळी ४:३० वाजता पुन्हा लग्न करतील आणि त्यासाठी तयारी सुरू आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते पहिल्यांदा "गीता गोविंदम" मध्ये एकत्र दिसले, जो बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. असेही म्हटले जाते की या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर हे कपल 'डियर कॉम्रेड' चित्रपटात एकत्र दिसले. त्यांनी त्यांचे नातं आतापर्यंत सिक्रेट ठेवलं होत. पण लग्नाच्या ३ दिवसआधी एक खास पोस्ट करुन त्यांनी चाहत्यांनी गूड न्यूज दिली.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. ते बऱ्याच काळापासून डेटिंग करत होते आणि त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरत होत्या, परंतु या कपलने कधीही अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. लग्नापूर्वी त्यांनी स्वतःच ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगितली. पण,चाहत्यांना आधीपासूनच त्यांना नात्याची खबर होती कारण रश्मिका आणि विजय अनेकदा एकत्र सुट्टीवर जात आणि वेगळे फोटो पोस्ट करत असत. पण त्यांच्या फोटोमध्ये लोकेशन सेम असायचे.

टॉलीवूडचे दिग्दर्शक तरुण भास्कर, शिव निर्वाण, वामसी पैदिपल्ली आणि संदीप रेड्डी वांगा त्यांच्या खास क्षणाचा भाग होण्यासाठी या समारंभात उपस्थित आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रश्मिका आणि विजय यांना एक पत्र लिहून त्यांचे मनापासून अभिनंदन केले.

Rashmika vijay wedding

चाहते विजय आणि रश्मिकाच्या लग्नातील फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशी अपेक्षा आहे की ते त्यांच्या कोडावा लग्न समारंभानंतर सायंकाळी ४:३० वाजता चाहत्यांसाठी एक फोटो पोस्ट करतील. त्यांनी आतापर्यंत पूलपार्टी, डिनर, हळदी, संगीत नाईटचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विराट कोहलीवर बंदी घातली जाणार? मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यावेळी घडली मोठी चूक

Maharashtra News Live Update: इंदोर-मनमाड-पुणे राज्य मार्गावरील वाहतूक उद्या बंद राहणार

Kalyan : ५ महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये गुन्हा केला, खबऱ्यांनी टीप दिली अन् खेळ खल्लास; मुंबईतून तिघांच्या आवळल्या मुसक्या

Maharashtra Politics: भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप; शिंदेंसमोरच उफाळली शिवसैनिकांची नाराजी, शेवटी खासदार भडकले

Ujani Dam Tourism: सोलापूरजवळ आहेत ६ सुंदर थंड हवेची ठिकाणं; निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विसराल ऑफिसचं सारं टेन्शन

SCROLL FOR NEXT