Rashmika-Vijay Viral Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Photo: रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या व्हायरल फोटोमागील सत्य उघडकीस, वाचा सविस्तर बातमी

विजय आणि रश्मिकाने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होत होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rashmika-Vijay Viral Photo Fact: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अनेकदा चर्चेत असतात. चाहत्यांना ते दोघे एकत्र दिसले की खूप आनंद होतो. रश्मिका आणि विजय अनेकदा एकत्र येण्याचे टाळतात. त्याचे हे एकमेकांपासून ठेवलेले जाणीवपूर्वक अनंतरमुळे लोक त्याच्यावर अधिकच संशय घेतात.

अलीकडेच दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यानंतर विजय आणि रश्मिकाने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होत होती. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या नात्यावर कधीच उघडपणे वक्तव्य केले नाही. त्यांनी नेहमीच आम्ही खास फ्रेंड आहोत असे सांगितले आहे. त्यांचा व्हायरल होत असलेल्या फोटोमागील सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

रश्मिकआणि विजयची केमिस्ट्री पाहणे चाहत्यांना नेहमीच आवडते. व्हायरल होत असलेले फोटो हे या दोघांचे मॉर्फ केलेले लग्नाचे फोटो आहेत. एका चाहत्याने त्यांनी नवविवाहित जोडपे म्हणून फोटोशॉप केले आहे. ज्यामध्ये रश्मिका मंदानाने वधूचा पोशाख, बांगड्या आणि लेहेंगा परिधान केला आहे आणि विजय देवरकोंडा शेरवानीमध्ये आहे. जे रश्मिका आणि विजय यांचा प्रेमाला अधिकृत करण्यासाठी आणि लग्नाची गाठ बांधण्याची वाट पाहू शकत नाहीत, त्या चाहत्यांकडून या व्हायरल फोटोला भरपूर प्रेम मिळत आहे. (Rashmika Mandanna)

करण जोहरच्या टॉक शोमध्ये विजय देवरकोंडा यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. करणने त्याला त्याच्या लव्ह लाईफबद्दल विचारले. जेव्हा करण जोहरने विजयला रश्मिका मंदानासोबतच्या त्याच्या कथित रोमान्सबद्दल विचारले. तेव्हा विजय म्हणाला, 'मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला तिच्यासोबत दोन चित्रपट केले. रश्मिका सुंदर आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती खूप चांगली मैत्रीण आहे. (Vijay Deverakonda)

विजय पुढे म्हणाला, 'तुम्ही चित्रपटांमधून खूप काही शेअर करता, जसे की यशाची शिखरे आणि चढ-उत्तर, त्यामुळे एक बाँड तयार होतो आणि सहज तुम्ही इतक्या लवकर जवळ येता की तुमच्यात कमी वेळातच एका नाते तयार होते. मला सहसा मुलींच्या जवळ जायला आणि मुलींच्या डोळ्यात बघायला थोडा वेळ लागतो.' रश्मिका आणि विजय काही वर्षांपूर्वी वेगळे झाले होते, पण 'लायगर'च्या अपयशामुळे ते जोडपे पुन्हा एकत्र आले. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

SCROLL FOR NEXT