Rashmika and Vijay Announce Scholarship Saam Tv
मनोरंजन बातम्या

Virosh Scholarship: लग्नानंतर रश्मिका-विजयची मोठी घोषणा; ४४ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर

Rashmika and Vijay Announce Scholarship: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी लग्नानंतर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. लग्नानंतर त्यांना ही घोषणा केलाी.

Shruti Vilas Kadam

Rashmika and Vijay Announce Scholarship: प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि त्याची पत्नी रश्मिका मंदाना यांनी त्यांच्या लग्नानंतर एक सामाजिक उपक्रम जाहीर केला आहे. पोल्यूमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी मदत जाहिर केली आहे. त्यांच्या लग्नानंतर या जोडीने केवळ सेलिब्रिटी लाइफसाठी नव्हे तर समाजसेवेसाठी देखील पाऊल उचलले आहे.

विजय आणि रश्मिका या दोघांनी तेलंगणाच्या नागरकर्नूल जिल्ह्यातील अचम्पेट विभागात 44 सरकारी शाळांमधील ९वी आणि १०वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरविणे हा आहे, यामुळे त्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक प्रगती करण्यासाठी ही संधी त्यांना मिळेल.

लग्नानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीवही व्यक्त केली. विजय आणि रश्मिका यांनी त्यांच्या विवाहसोहळ्याचा आनंद आपल्या चाहत्यांसह आणि समाजासह शेअर करण्यासाठी या शिष्यवृत्तीची घोषणा केली. या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

लग्नानंतर हे कपल विजयच्या मूळ गावी, थुम्मनपेटा इथं पोहोचलं. तिथं त्यांनी 'सत्यनारायण पूजा' केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना विजयनं 'देवरकोंडा चॅरिटेबल ट्रस्ट' च्या वतीनं ही घोषणा केली. रश्मिका विजयचं लग्न २६ फेब्रुवारीला पार पडलं. तर उद्या हैदराबाद इथं विजय रश्मिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा थाटामाटात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT