Rashmika Mandanna Birthday saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Birthday : लग्नानंतर रश्मिकाचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन; वडिलांनी दिलं खास गिफ्ट, फोटो पाहून चकीत व्हाल

Rashmika Mandanna Birthday Photos : साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदानाने बर्थडे सेलिब्रेशनचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. वाढदिवसाला रश्मिकाला वडिलांनी एक मूल्यवान भेटवस्तू दिली आहे.

Shreya Maskar

रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले.

रश्मिकाचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा झाला.

रश्मिकाला वडिलांनी एक खास गिफ्ट दिले.

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna Birthday) ५ एप्रिलला वाढदिवस होता. रश्मिका आता 30 वर्षांची झाली आहे. लग्नानंतर रश्मिकाचा हा पहिलाच वाढदिवस होता. जो थाटामाटात साजरा झाला. अनेक वर्षे डेट करून रश्मिका आणि विजयने 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. आता रश्मिका मंदानाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत. वाढदिवसानिमित्त रश्मिकाच्या वडीलांनी तिला एक खास सरप्राईज गिफ्ट दिले आहे.

रश्मिका मंदानाने वाढदिवस कूर्ग (कोडागु) येथे आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने पाडी श्री इग्गुथप्पा मंदिरालाही भेट दिली. पाडी श्री इग्गुथप्पा मंदिर हे पाऊस आणि पिकांचे देवता भगवान सुब्रमण्यम यांना समर्पित असलेले एक पवित्र आणि प्राचीन मंदिर आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

रश्मिकाचे सरप्राइज गिफ्ट

रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वडिलांनी तिला शहराच्या जवळ असलेला एक बंगला गिफ्ट केला आहे. ज्याचे नाव 'सेरेनिटी' (Serenity) असे आहे. रश्मिकाचे मूळ गाव विराजपेट आहे, जे कर्नाटक राज्यातील कोडागु जिल्ह्यातील एक शहर आहे. रश्मिकाच्या वडीलांनी लेकीसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि कुटुंबिय पाहायला मिळाले.

रश्मिका मंदानाने वाढदिवसाला खूपच खास लूक केला होता. तिने पारंपरिक कोडवा साडी नेसली होती. (कोडवा साडीमध्ये महिला साडीच्या चुण्या पाठीमागे ठेवून नेसतात आणि साडीचा मोकळा पदर उजव्या खांद्यावर पिनने लावतात.) केसात गजरा, सोन्याचे दागिने घालून तिने हा लूक पूर्ण केला होता. रश्मिका आणि विजय दोघेही एकत्र खूपच छान दिसत होते.

वर्कफ्रंट

रश्मिका मंदाना लवकरच 'कॉकटेल २' मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 'रणबाली' (Ranabaali) मध्ये एकत्र दिसणार आहेत. लग्नानंतर हा त्यांचा पहिला चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : २०० फूट खोल दरी, उंच कातळभिंती अन् अंधारलेली वाट; मुंबईजवळ लपलंय 'हे' रहस्यमय ठिकाण

Maharashtra News Live Update: सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख

Lack of sleep: 8 तासांपेक्षा कमी झोप घेताय? हे गंभीर आजार होण्याचा वाढतो धोका

Veen Doghatli Hi Tutena : राजवाडेंचा रोमँटिक अंदाज अन् कँडल लाईट डिनर डेट; समर देणार स्वानंदीला गोड सरप्राईज, VIDEO एकदा पाहाच

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT