Raqesh Bapat Hospitalised Saaam TV
मनोरंजन बातम्या

Raqesh Bapat Share Video: शूटिंगदरम्यान अभिनेता राकेश बापटची प्रकृती बिघडली; दुबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Raqesh Bapat : राकेशने व्हिडीओच्या शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Pooja Dange

Raqesh Bapat Hospitalised : टीव्ही आणि चित्रपट अभिनेता राकेश बापटने त्याच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची पोस्ट पाहून त्याचे चाहते चिंतेत आहेत. राकेशने त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट शेअर केले आहेत.

इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातात इंट्राव्हेन्स ड्रीप देखील आहे. राकेश हॉस्पिटलाईज होण्याची हिची पहिली वेळ नाही.

२०२१मध्ये त्याला किडनी स्टोन झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 'बिग बॉस ओटीटी' शो देखील त्याला त्याच्या आजारपणामुळे सोडावा लागला होता.

राकेशने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. राकेश दुबईला एका प्रोजेक्टचे शूट करण्यासाठी गेला होता.

व्हिडीओ शेअर करत राकेशन बापटने सांगितले की, मी दुबईमध्ये शूटिंग करत होतो. इथे तापमान खूप जास्त आहे. त्यामुळे मला खुप त्रास झाला. ताप आणि ब्लड प्रेशरमुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राकेश बापट सध्या मुख्य अभिनेता म्हणून काम करत नसला तरी तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे अपडेट शेअर करत असतो. तुम बिन, कोई मेरे दिल मै है, वृंदावन, आणि सविता दामोदर परांजपे या चित्रपटातील भूमिकांसाठी तो ओळखला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळण्याची घटना

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT