Bad Bunny Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bad Bunny: रॅपरला गर्लफ्रेंडने शिकवली चांगलीच अद्दल, बनीवर ठोकला तीनशे कोटींचा दावा! काय आहे कारण?

गायक आणि रॅपर बनीवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने खटला दाखल केला आहे.

Chetan Bodke

Bad Bunny: हॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यात खूप चर्चेत असतात. यामध्ये सर्वाधिक रॅपर बॅड बनीचे नाव अग्रस्थानी असतं, जो त्याच्या रॅपिंगसाठी खूप लोकप्रिय आहे. नुकतीच, रॅपर बनीबद्दल एक मोठी बातमी येत आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गायक आणि रॅपर बनीवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने खटला दाखल केला आहे.

अलीकडेच, रॅपर आणि गायक बनीच्या माजी प्रेयसीने त्याच्याविरुद्ध केस दाखल केली आहे, ज्यामध्ये तिने आरोप केला आहे की, रॅपरने तिच्या परवानगीशिवाय तिचा आवाज वापरला आहे.  बनीच्या गर्लफ्रेंडचे नाव कार्लिस्ले डी ला क्रूझ आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच वर्षांनंतर आता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

त्याची गर्लफ्रेंड कार्लिस्ले डी ला क्रूझ म्हणते, बनीने तिची फसवणूक केली आणि तिला न विचारता त्याच्या दोन गाण्यांमध्ये त्याचा आवाज वापरला. ही दोन्ही गाणी यूट्यूबवर चांगलीच लोकप्रिय आहेत. 'पा ती' या पहिल्या गाण्याला यूट्यूबवर 355 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दुसरे गाणे 'दोस मिल' 60 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या दोन्ही गाण्यांना रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बनीच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर आरोप केला आहे की त्याने ती दोन्ही गाणी रेकॉर्ड, प्रमोशन आणि ग्लोबल कॉन्सर्टसाठी वापरली. या सगळ्यात त्याने कधीच कार्लिजची परवानगी घेतली नव्हती. एवढेच नाही तर, कार्लिजने त्याच्याकडून ४० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३३० कोटी रुपयांची भरपाई म्हणून मागणी केली आहे. आता या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT