Badshah Sanak Music Controversy Instagram
मनोरंजन बातम्या

Badshah Sanak Music Controversy: भोलेनाथचा अपमान..? बादशाहच्या अडचणीत वाढ; 'सनक' गाण्याविरोधात तक्रार दाखल...

महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यासह अनेक भाविकांनी गाण्यात भोलेनाथच्या नावाचा अश्लिल शब्द वापरल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

Chetan Bodke

Badshah Sanak Music Controversy: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर बादशाह नेहमीच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आहे. नुकताच बादशाहचा नवं अल्बम साँग रिलीज झाल्यापासून बराच वाद उफाळून आला आहे. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर भगवान शंकराच्या भक्तांनी रॅपरवर एफआयआर दाखल केली आहे. गाण्यात अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या त्याच्या विरोधात अनेक लोकं बोलत आहेत. शिवभक्तांनी प्रसिद्ध रॅपरवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.  

महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यासह अनेक भाविकांनी गाण्यात भोलेनाथच्या नावाचा अश्लिल शब्द वापरल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यांनी गाण्यातून देवाचे नाव काढून माफी मागण्यास सांगितले आहे. माफी न मागितल्यास बादशाहविरोधात उज्जैनसह अन्य शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. (Latest Marathi News)

दरम्यान इंदूर येथील 'परशुराम सेना' या संघटनेने गायक बादशाहवर एका नवीन गाण्यात 'भोलेनाथ' हा शब्द वापरल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Bollywood News)

एमजी रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी संतोष सिंह म्हणतात, 'परशुराम सेना' या स्थानिक हिंदू संघटनेने बादशाहच्या गाण्याबाबत तक्रार दिली असून चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. या तक्रारीवर अद्याप एफआयआर नोंदवण्यात आली नसल्याचेही सांगितले. (Entertainment News)

या संघटनेशी संबंधित वकील विनोद द्विवेदी यांनी आरोप केला आहे की, बादशाहच्या नव्या 'सनक' या गाण्याचे बोल अपशब्दांनी भरलेले आहेत आणि एका ठिकाणी 'भोलेनाथ' हा शब्द वापरण्यात आला आहे. बादशाहचे हे गाणे केवळ हिंदू समाजालाच नव्हे तर संपूर्ण सुसंस्कृत समाजाला आक्षेपार्ह असल्याचं त्यांनी सांगितले.

सनक नावाच्या अल्बममधील हे गाणं सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. आतापर्यंत या गाण्याला युट्युबवर १.८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात काही प्रमाणात अश्लिल शब्दांचा वापर करत उल्लेख केला आहे, असे म्हणत अनेक शिवभक्त सोशल मीडियावर चांगलेच संतापले आहेत. गाण्याच्या काही भागांवर आक्षेप नोंदवला असून या वादावर रॅपर बादशाहने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Maharashtra Live News Update : 'भाजप लोकांची घरं फोडून राजकारण करतं'- उद्धव ठाकरेंचा घणाघात

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

SCROLL FOR NEXT