Adipurush Motion Poster: श्री राम भक्तांसाठी खास पर्वणी; ‘आदिपुरूष’ चा मोशन पोस्टर पाहून नक्कीच व्हाल नतमस्तक...

‘आदिपुरूष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटचा नवा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे.
Adipurush Motion Poster
Adipurush Motion PosterInstagram
Published On

Adipurush Motion Poster Out: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाची सध्या रामभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. घोषणा झाल्यापासून चर्चेच्या अग्रस्थानी असलेल्या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. नुकतंच चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटचा नवा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे.

Adipurush Motion Poster
KKBKKJ 1st Day Collection: प्रदर्शनापूर्वी हवेत उडणाऱ्या भाईजानचा KKBKKJ प्रदर्शनानंतर आपटला?, चित्रपटाने पहिल्या दिवशी केली फक्त इतकी कमाई...

चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या वादाला वेगळेच तोंड फुटले. चित्रपटात वापरलेले VFX आणि रावणाच्या भूमिकेवरून दिग्दर्शक ट्रोल झाले होते. पण ओम राऊतांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू ठेवली. पण आज अक्षय्य तृतीये निमित्त ओम राऊत ह्यांनी पुन्हा एकदा ‘आदिपुरूष’ चित्रपटाचे नवे आणि खास मोशन पोस्टर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. अंगावर काटा आणणारे हे पोस्टर प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.

दिग्दर्शकांनी हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “जब न जा पाओ सारे धाम, तो बस ले लो प्रभु का नाम, जय श्रीराम” अशा आशयाचे कॅप्शन देत ओम राऊत यांनी टीझर शेअर केला आहे.

दिग्दर्शकांनी शेअर केलेल्या मोशन पोस्मटरध्ये, ‘तेरे ही भरोसे है हम... तेरे ही सहारे... दुविधा कि घडी मे मन तुझको ही पुकारे... तेरे ही बल से, हे बल हमारा... तूही करेगा मंगल हमारा... मंत्रोसे बढकर तेरा नाम... जय श्री राम ... ’ असे या मोशन पोस्टरमध्ये शब्द वापरण्यात आले आहेत. प्रभावशाली संगीताची जोड असलेलं हे मोशन पोस्टर सध्या सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घालत आहे. (Bollywood Film)

Adipurush Motion Poster
Onkar Bhojane Viral Video: ओंकारने भर नाटकात काढली प्रेयसीची आठवण; ‘तू दूर का…’ म्हणत झाला भावूक

चित्रपट येत्या १६ जून रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास रामाच्या भूमिकेत, क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत, देवदत्त नागे भगवान हनुमानाच्या भूमिकेत तर सर्वाधिक ट्रोल झालेल्या रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com