Deepika Ranveer Wedding Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika-Ranveer: दीपिका- रणवीरच्या लग्नाचा चौथा वाढदिवस, सरप्राईजसाठी पत्नीचे गाठले ऑफिस

रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने दीपिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला सरप्राईज दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Deepika-Ranveer Wedding Anniversary: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या बॉलिवूडमधील जोडीवर चाहत्यांचे खूप प्रेम आहे. ज्यांची केमिस्ट्री लोकांना खऱ्या आयुष्यात तसेच रील लाइफमध्येही पाहायला आवडते. बॉलिवूडमधील दीपिका आणि रणवीर यांच्या जोडीने काल त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला आहे. दोघेही नेहमीच लाइमलाइटचा भाग असतात. सगळ्यांना माहित आहे की रणवीर पत्नी दीपिकाला खूश करण्याची आणि तिला स्पेशल वाटावे अशी संधी कधीही सोडत नाही. मग तो त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची संधी कशी सोडेल?

रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने दीपिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला सरप्राईज दिले आहे. दीपिकाला आश्चर्यचकित करून रणवीरने पुन्हा एकदा कपल गोल्स सेट केले आहेत. लग्नाच्या वाढदिवशीही आपल्या प्रोफेशनल कमिटमेंटमुळे व्यस्त असलेल्या दीपिकाला यापेक्षा चांगले सरप्राईज मिळू शकले नसते. (Social Media)

रणवीर सिंगने दीपिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला फुलं आणि चॉकलेट देऊन एक खास सरप्राईज दिलं. तर अचानक पती रणवीरला समोर पाहिल्यानंतर नक्कीच दीपिकालाही आनंद झाला. इंस्टा स्टोरीमध्ये रणवीरने सरप्राईज व्हिजिटचा फोटो पोस्ट केला आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये रणवीरने लिहिले की, "जेव्हा तिला लग्नाच्या वाढदिवशी सुद्धा काम असते, तेव्हा तुम्ही तिला तिच्या ऑफिसमध्ये जाऊन सरप्राईज करता." फुले आणि चॉकलेटला कमी लेखू नका. अशावेळी डायमंडची गरज नसते, लिहून ठेवा आणि माझे नंतर आभार माना. (Actors)

Ranveer Singh Instagram Story

बॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर आणि दीपिका यांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले होते. या दोघांचे लग्न दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धतीने पार पडले होते, ज्यामध्ये फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे लोक सहभागी होते. लग्नाआधी दोघांनी जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केले, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT