Deep-Veer Baby Name  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika-Ranveer Baby Name : रणवीरने लाइव्ह शोमध्ये ठरवलं होतं बाळाचं नाव; आता चाहत्यांनीही सूचवलंय, नेमकं दीपवीर काय ठेवणार मुलीचं नाव?

Deepika Ranveer : दीपिकाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. दीपवीर आई-बाबा झाले आहेत. आता रणवीर आणि दीपिका मुलीचे नाव काय ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Shreya Maskar

नुकतेच रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने काल म्हणजे 8 सप्टेंबर 2024 रोजी मुलीला जन्म दिला. रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. हा चिमुकला पाहुणा त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहे.

गणेशोत्सव काळात रणवीरच्या घरात लक्ष्मी आली आहे. लोकांना त्यांच्या मुलीबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक आहेत.रणवीर-दीपिका त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. रणवीरने एका शोमध्ये आपल्या बाळासाठी नाव ठरवल्याचे सांगितले होते.

रणवीर काय ठेवणार बाळाचे नाव?

रणवीर सिंहने 'द बिग पिक्चर' या शोच्या एका एपिसोडमध्ये आपल्या मुलांच्या नावाचा खुलासा केला होता. या शोवर शौर्यवीर नावाच्या एका प्रेक्षकांनी रणवीरला मुलाच्या नावांविषयी प्रश्न विचारतात रणवीरने सांगितले की, "मी बाळाच्या नावांची यादी शॉर्टलिस्ट करतोय. तुझ नाव देखील छान आहे. जर तुला काही समस्या नसेल तर शौर्यवीर सिंह मी घेऊ शकतो का?" रणवीरला जर मुलगा झाला असता तर त्यांला 'शौर्यवीर' नाव ठेवायला आवडले असते. अशी त्यांनी तेव्हा इच्छा व्यक्त केली. मात्र आता दिपवीरला मुलगी झाल्यामुळे ते नाव काय ठेवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. रणवीर-दीपिकाला चाहत्यांनी स्वतः देखील बाळाचे नाव सुचवले आहे.

चाहत्यांनी काय नाव सुचवले?

रणवीरने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक कलाकारांच्या तसेच चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. एका यूजरने तर "छोटी मस्तानी आली" अशी क्यूट कमेंट केली आहे. तसेच बाळाच्या पहिल्या झलकची देखील चाहत्यांनी मागणी केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी तर कमेंट्समध्ये बाळाचे नाव सुचवले आहे. चाहत्यांनी दीपिका आणि रणवीरच्या नावातील अक्षरांवरून नवीन नाव सुचवत आहेत. कमेंट्समध्ये एका चाहत्यांने 'रविका' तर एकाने 'देविका' असे नाव सुचवले आहे. आता दीपवीर मुलीचे नाव काय ठेवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT