Ranveer Singh and Deepika Padukone romantic Photo  Ranveer Singh | Instagram@ranveersingh Deepika Padukone | Instagram@deepikapadukone
मनोरंजन बातम्या

Ranveer - Deepika Relationship : दीपिकासोबत बिनसल्याच्या चर्चांना आलं होतं उधाण; रणवीरनं फोटो टाकल्यानंतर लाट ओसरली

Ranveer - Deepika : रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे.

Pooja Dange

Ranveer Singh shares Photo with Deepika Padukone : रणवीर सिंग 6 जुलै रोजी 38 वर्षांचा झाला. आलिया भट्टपासून ते करण जोहरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु त्याच्या वाढदिवशी दीपिकाने शुभेच्छा न दिल्याने चाहते खुप नाराज झाले होते. नेटकऱ्यांनी दीपिकाला यावरून ट्रोल केले होते. तसेच त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

वाढदिवसाच्या काही दिवसांनंतर, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकणाऱ्या रणवीरने शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार मानले आणि 9 जुलै रोजी त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसह त्याचे एक सुंदर ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. रणवीर सिंगने दीपिका पदुकोणसोबतचा त्याचा एक गोड फोटो शेअर केला आहे. आणि त्या फोटोवर लिहिले आहे, "वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छांसाठी सर्वांचे अनंत आभार."

या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोमध्ये ते दोघेही समुद्रामध्ये दिसत आहे. दीपिका आणि रणवीर बोटीमधून त्यांचे चेहरे बाहेर काढले असून लाटा आणि एकमेकांची सोबत एन्जॉय करत आहेत . लव्ह बर्ड्सने रणवीरच्या वाढदिवसानंतर एकत्र वेळ घालावा आहे. कदाचित दोघे अलिबाग गेले असावेत.

Ranveer Singh and Deepika Padukone romantic Photo

हा फोटो पोस्ट करून रणवीर आणि दीपिकाने चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या शंका आणि प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. (Latest Entertainment News)

दीपिका पदुकोण प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे. तर हृतिक रोशनसह ती फायटरमध्ये पहिल्यांस काम करणार आहे. दुसरीकडे रणवीरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT