Ranveer Singh Got zero in maths Instagram @ranveersingh
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Spoke About School Life: अभिनयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या रणवीरला या विषयात मिळालाय भोपळा

Ranveer Singh Mark In Maths : रणवीरने त्याच्या विनोदी शैलीत सांगितले की, त्याला गणिताच्या परीक्षेत मायनस 10 गुण मिळाले होते.

Pooja Dange

Ranveer Singh Got Minus 10 In Maths: रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी चित्रपट रॉकी ओर रानी की प्रेम कहानी प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत रणवीर सिंग त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

दमदार अभिनय आणि विलक्षण व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा हा अभिनेता, आलिया भटसह या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रमोशनल बझ दरम्यान, रणवीरने त्याच्या शालेय दिवसातील एक किस्सा शेअर केला आहे. ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. (Latest Entertainment News)

रणवीर सिंग भन्नाट सेन्स ऑफ ह्यूमरसाठी ओळखला जातो. परंतु तो त्याच्या शाळेत अभ्यासात कसा होता याचा खुलासा त्याने केला आहे. रणवीरचा हा किस ऐकून प्रेक्षकांना त्यावर विश्वास बसणार नाही. रणवीरने त्याच्या विनोदी शैलीत सांगितले की, त्याला एकदा गणिताच्या परीक्षेत 100 पैकी मायनस 10 गुण मिळाले होते.

सोशल मीडियावर त्याच्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणवीर त्याच्या गणितात मिळालेल्या गुणांविषयी सांगत आहे. रणवीर सिंग सांगता आहे की, “कोणाला १०० पैकी शून्य मार्क्स मिळाले आहेत ? मला मिळाले आहेत. मला गणितात अंडा मिळाला होता, आणि बोलता होतो त्यामुळे मायनस १० आधीच देण्यात आले होते, तर शंभरावर मायनस दहा.”

रॉकी और रानी की प्रेम कहानी

'गली बॉय'नंतर आलिया भट्ट आणि रणवीर सिंग 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी एकत्र ऑनस्क्रीन दिसणार आहेत. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला आहे. रोमँटिक कॉमेडी-ड्रामा असलेला हा चित्रपट रॉकी आणि राणी यांच्याभोवती फिरतो. दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि त्यांचे प्रेम सिद्ध करण्यासाठी आपापल्या कुटुंबाशी लढतात.

रणवीर आणि आलियासोबत, रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटात बंगाली चित्रपटसृष्टीतील चुर्णी गांगुली आणि तोटा रॉय चौधरी यांसारखी काही प्रतिष्ठित नावे देखील आहेत. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Accident : भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला, विटांखाली दबून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

Pune Politics: जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच अजित पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपचं 'कमळ' घेणार हाती

Maharashtra Live News Update: नगर पालिके प्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत रायगडमध्ये महायुती तुटण्याचे खा. तटकरे यांचे संकेत

Virat Kohli: जगात भारी, विराट कोहली! ODI रँकिंगमध्ये पुन्हा नंबर १, रोहित शर्माची जागा घेतली

Gajra Hairstyles: मराठमोळा नखरा अन् केसांत माळा मोगऱ्याचा गजरा, या आहेत 5 सुंदर हेअरस्टाईल्स

SCROLL FOR NEXT