Ranveer Allahbadia Not Prefect Son Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Allahbadia: 'मी माझ्या आईवर प्रेम करतो, पण...'; रणवीर अलाहाबादिया नाही परफेक्ट मुलगा, केले स्वतः कबूल!

Ranveer Allahbadia Not Prefect Son: रणवीर अलाहाबादिया इंडियाज गॉट टॅलेंट शो दरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे.

Shruti Vilas Kadam

Ranveer Allahbadia: इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला एक आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता, त्यानंतर तो चर्चेत आहे. सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, यूट्यूब ने तो वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे. रणवीर इलाहाबादियाला बीअरबायसेप्स असेही म्हणतात. रणवीरच्या वादात, त्याचा एक जुना पॉडकास्ट व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीरने मी चांगला मुलगा नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने यूएईतील करोडपती उद्योगपती अंकुर अग्रवालला आमंत्रित केले होते. तेव्हा त्याने मुलगा म्हणून त्याला होत असलेल्या पश्चात्तापाबद्दल सांगितले. या संभाषणात दोघांनीही सांगितले की, त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे ते त्यांच्या आईला वेळ देऊ शकत नाहीत.

चांगला मुलगा असण्याबद्दल रणवीर काय म्हणाला?

रणवीरच्या शोमध्ये अंकुर अग्रवाल म्हणतो, "कदाचित मी चांगला मुलगा नाहीये, मी तिला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. आपण आपलं आयुष्य खूप व्यस्त केलं आहे, हे मला समजतं आणि मी माझ्या आईला वेळ देण्याचा प्रयत्नही करतो. पण मला माहित नाही की मी कधी खरच वेळ देऊ शकेन का.” यावेळी रणवीरने अंकुरला विचारले की तो स्वतःला एक चांगला मुलगा मानतो का, यावर त्याने उत्तर दिले, 'नाही'. पुढे रणवीर म्हणाला, "मलाही हे जाणवतंय मित्रा, मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो, पण काय करू?" असे म्हणत रणवीरने चांगला मुलगा नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती.

रणवीर अलाहाबादिया होतय खूप ट्रोल

या सगळ्यामध्ये, रणवीर अलाहाबादियाला सर्व बाजूंनी ट्रोल केले जात आहे. राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत, सर्वजण त्याच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. नेटकरी त्याच्याबद्दल वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, अशा लोकांना गाढवावर बसवून त्यांचे तोंड काळे करून मिरवायला लावले पाहिजे, तर, दुसरा नेटकरी म्हणाला, त्यांच्या कार्यक्रमात येण्याचे निमंत्रणही रद्द केले पाहिजे. मात्र, दुसरीकडे, राखी सावंत आणि उर्फी जावेद रणवीरला पाठिंबा देत आहेत. राखीने सर्वांना त्याला माफ करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT