Ranveer Allahbadia Controversy Over Indias Got Latent X (Twitter)
मनोरंजन बातम्या

Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची जीभ छाटणाऱ्याला ५ लाख; वादग्रस्त विधानावरून एन्फ्ल्यूएन्सरचीच वादग्रस्त घोषणा

Ranveer Allahbadia Controversy : 'इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमामध्ये रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त विधान केले होते. यावरुन एका एन्फ्ल्यूएन्सरने त्याची जीभ छाटून देणाऱ्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे म्हटले आहे.

Yash Shirke

Ranveer Allahbadia Controversial Statements : स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो वादात अडकला आहे. या शोच्या शेवटच्या भागामध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने हजेरी लावली होती. दरम्यान त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणावरुन रणवीरसह समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट शोचे निर्माते बलराज घई यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

रणवीर अलाहाबादियाने 'इंडियाज गॉट लेटेंट' शोच्या एका भागामध्ये मध्ये आई-वडिलांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्य केले. यावरुन रणवीरच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावर अनेक ठिकाणी एफआयआरदेखील दाखल करण्यात आली आहे. रणवीरने वक्तव्यावर माफी मागत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

फैजान अन्सारी या एन्फ्ल्यूएन्सरने या प्रकरणावर अधिक वादग्रस्त विधान केले आहे. फैजानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने 'यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने इतके घृणास्पद वक्तव्य केले आहे की, मी जर तिथे असतो तर त्याची जीभ कापली असती. जर संपूर्ण देशातल्या कोणत्याही व्यक्तीने रणवीर अलाहाबादियाची जीभ छाटून मला आणून दिली. तर मी त्या व्यक्तीला ५ लाख रुपये बक्षीस म्हणून देईन', असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

रणवीरच्या विधानावर विविध स्तरांवरुन नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाचा दखल घेतली आहे. महाराष्ट्र सायबर सेलने समय रैना, शोचे निर्माते बलराज घई आणि अन्य ३० ते ४० जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. शोच्या पहिल्या एपिसोडपासून ते सहाव्या एपिसोडपर्यंतचे सर्व होस्ट आणि पाहुण्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehndi Design : स्टायलिश अन् हटके मेहंदी डिझाइन; दिवाळीला हात दिसतील सुंदर, पाहा PHOTOS

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

SCROLL FOR NEXT