Reshma Shinde SAAM TV
मनोरंजन बातम्या

यंदा कर्तव्य आहे! 'घरोघरी मातीच्या चुली' फेम 'Reshma Shinde'ची लगीनघाई, होणारा नवरा कोण?

Reshma Shinde Wedding: महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या केळवणाला सुरूवात झाली आहे.

Shreya Maskar

तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरूवात होते. हीच लग्नसराईची धामधूम मराठी मनोरंजन सृष्टीत पाहाया मिळत आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरात लगीनघाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या ती 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. रेश्माला खरी लोकप्रियता 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून मिळाली. सध्या रेश्माच्या केळवणाला सुरूवात झाली असून तिचे केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

मराठी अभिनेता सुयश टिळकने रेश्माच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुयशने शेअर केलेल्या फोटोमध्ये छान केळवणाचे डेकोरेशन पाहायला मिळत आहे. फुलांच्या माळा आणि त्यावर 'रेश्माचे केळवण' असं लिहिलेल पाहायला मिळत आहे. तसेच रेश्मा समोर पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे. आपल्या कलाकार मित्रमंडळींसोबत रेश्मा 'ब्राइड टू बी'चा केक कापत आहे. केळवणासाठी रेश्माने छान साडी नेसली आहे. ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच गोड दिसत आहे. केळवणाच्या फोटोंमध्ये तिच्या मित्रपरिवारात हर्षदा खानविलकर, शाल्मली तोळ्ये, आशुतोष गोखले, ऋतुजा बागवे, सुयश टिळक, अनघा भगरे हे कलाकार पाहायला मिळत आहेत.

आता मात्र चाहत्यांना रेश्माचा नवरा कोण याची उत्सुकता लागली आहे. मात्र अजूनही रेश्माने याबाबत कोणताच खुलासा अद्याप केला नाही. तिच्या केळवणाची बातमी ऐकताच चाहते खूप खुश झाले आहेत. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi Tukda Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Sanju Samson : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; अचानक स्पर्धेतून नाव घेतलं मागे; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT